Friday, May 3, 2024
Homeजळगावरावेरतील २८ वर्षीय तरुणांची आत्महत्या

रावेरतील २८ वर्षीय तरुणांची आत्महत्या

रावेर|प्रतिनिधी raver

शहरातील शिवाजी चौक परिसरात राहणा-या २८ वर्षीय अविवाहीत युवकाने तापी नदीत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.आत्महत्या का केली असावी हे मात्र कळू शकले नाही.

- Advertisement -

येथील योगेश प्रभाकर महाजन (वय २८)असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नावं आहे.कोणाला काही न सांगता दि.१७ रोजी सायंकाळी सात वाजता टिव्हीएस कंपनीची क्र. MH 19 PC 7228 गाडी घेवून निघुन गेला होता. घरी आला नाही म्हणुन त्याच्या नातलकांनी शोधाशोध घेतला असता, त्याची मोटरसायकल निंभोरासीम जवळील तापी नदीवर दिसली. पाण्यात शोध घेतला असता त्याचा मृत्युदेह मिळून आला.या घटनेने शहरात पसरतात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या