Tuesday, May 21, 2024
Homeदेश विदेशधक्कादायक! एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या

धक्कादायक! एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या

नवी दिल्ली | New Delhi

गुजरातमधील (Gujarat) सुरत (Surat) येथे एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तीन बालकांचा समावेश असून या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. या कुटुंबाने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमुळे (Suicide Note) ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे दिल्लीतील बुरारी आत्महत्या प्रकरणाची आठवण झाली आहे…

- Advertisement -

Nashik Crime News : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; सोलापूरात ड्रग्जचा कारखाना
उद्ध्वस्त, ‘इतक्या’ कोटींचा मुद्देमाल हस्तगत

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शनिवार (दि.२८) रोजी सूरतच्या पालनपूर पाटिया (Palanpur Patiya) येथील सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये घटना घडली. मृतांमध्ये मनीष सोलंकी, त्यांची पत्नी रीता सोलंकी, वडील कानू सोलंकी, आई शोभा सोलंकी तसेच दिशा, काव्या आणि कुशल नामक तीन मुलांचा (Children) समावेश आहे. यांपैकी ६ जणांचा विष खाल्याने तर एकाने गळफास घेतल्याने मृत्यू (Death) झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

CM Eknath Shinde : फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, या घटनेची माहिती शेजाऱ्यांना कळाली असता त्यांनी तात्काळ पोलिसांना (Police) कळविली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला. तर या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तसेच या कुटुंबात काही वाद होते की आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Sharad Pawar : “महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने…”; मराठा आरक्षणावर शरद पवारांचे पहिल्यांदाच भाष्य

- Advertisment -

ताज्या बातम्या