Sunday, April 27, 2025
Homeनाशिकसप्तश्रृंगी गडाच्या शीतकड्यावरुन उडी घेऊन महिलेची आत्महत्या

सप्तश्रृंगी गडाच्या शीतकड्यावरुन उडी घेऊन महिलेची आत्महत्या

वणी । प्रतिनिधी Vani

श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील शीतकड्यावरुन दरीत उडी घेवून महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

जाटपाडे (ता. मालेगाव) येथील मनीषा योगेश जगताप (35) दि. 28 पासून घरातून बेपत्ता होत्या. याबाबत कुटुंबीयांनी नातेवाईक व परिसरात शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत. शनिवारी (दि. 29) कुटुंबातील सदस्य मनीषाचा शोध घेत असताना सप्तशृंगगडावर शीतकडा परिसरातील खोल दरीत महिलेचा मृतदेह पडल्याचे दिसून आले.

पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थ व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील मंगेश केदारे, संकेत नेवकर, सागर गावित, कृष्णा जोपळे, नानाजी सोनवणे, ज्ञानेश्वर गावित, पराग कुलकर्णी आदींच्या मदतीने खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, ही महिला मनीषा जगताप असल्याची खात्री झाली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...