Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedUdid Maka Medu Vade : सकाळचा नाष्टा चांगला हवाय तर बनवा 'उडीद-मक्याचे...

Udid Maka Medu Vade : सकाळचा नाष्टा चांगला हवाय तर बनवा ‘उडीद-मक्याचे मेदू वडे’

साहित्य –

पाव किलो उडिद डाळ, पाव किलो मक्याचे दाणे, दोन मध्यम आकाराचे कांदे, चार मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग, हळद, जिरे, मीठ.

कृती –

– प्रथम उडीद डाळ स्वच्छ धुऊन रात्रभर (किमान 5 ते 6 तास) पाण्यात भिजत घाला.

- Advertisement -

– मक्याचे दाणे उकडून घ्या.

– आता भिजलेली उडीद डाळ आणि मक्याचे उकडलेले दाणे एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.

– त्यानंतर कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरच्याही बारीक चिरून घ्या.

– सर्व मिश्रण एका पातेल्यात एकत्र करून त्यात आवश्यकतेनुसार हिंग, हळद, जिरे, मीठ एकजीव करून घ्या.

– आता गॅसवर एका कढईत तेल गरम करत ठेवा. मग त्यात मेदू वडे तळून घ्या. हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर खाण्यासाठी सर्व्ह करा.

– दिपाली अग्रवाल (औरंगाबाद)

- Advertisment -

ताज्या बातम्या