Tuesday, February 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDCM Sunetra Pawar: परंपरेचा पुढचा अध्याय, भावनिक क्षणी, सुनेत्रा अजित पवारांनी स्वीकारला...

DCM Sunetra Pawar: परंपरेचा पुढचा अध्याय, भावनिक क्षणी, सुनेत्रा अजित पवारांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार

मुंबई | Mumbai
दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा आज पदभार स्वीकारला आहे. २८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर ३१ जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती त्यानंतर आज मंगळवारी त्यांनी मंत्रालयात जात उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे.

सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारते वेळी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवारही सोबत होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जेष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ, तसेच इतर मंत्री आणि आमदार उपस्थित होते. यावेळी पार्थ पवार आणि अदिती तटकरेंना अश्रू अनावर.

- Advertisement -
परंपरेचा पुढचा अध्याय, भावनिक क्षणी, सुनेत्रा अजित पवारांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार

उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारण्याआधी सुनेत्रा पवार यांनी सकाळी मुंबईतील प्रसिध्द सिध्दिविनायक मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, पार्थ पवार, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

YouTube video player

Raj Thackeray: भाषाभेदावर राज ठाकरे आक्रमक; भागवतांच्या विधानावर सडकून टीका, म्हणाले, इथले सत्ताधारी लिबलिबित…

दरम्यान, आज पदभार स्वीकारल्यानंतर त्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत, जिथे त्या आपल्या खात्याचे पहिले निर्णय घेऊ शकतात. आज संध्याकाळी सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना होणार असून, तिथे त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Chandrapur Mayor Election : काँग्रेसला धानोरकर-वडेट्टीवार वादाचा फटका; ठाकरे सेनेच्या पाठिंब्याने...

0
चंद्रपूर | Chandrapaur काँग्रेसमधील धानोरकर आणि वडेट्टीवार वादामुळे राज्यभर चर्चेत असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज (मंगळवारी) निवडणूक (Chandrapur Mayor Election 2026) होत...