Monday, November 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदादा, तुमचा प्रवास अर्धवट राहिला असेल, पण तुमच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण...

दादा, तुमचा प्रवास अर्धवट राहिला असेल, पण तुमच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण करू; अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावूक

पुणे | Pune
दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात अनावरण करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार भावुक झाल्या.

काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?
पुणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दादांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटले की, “आजचा क्षण माझ्यासाठी अतिशय भावनिक आहे. ज्या पुणे जिल्हा परिषदेवर आदरणीय दादांनी मनापासून आणि जीवापाड प्रेम केले, ज्या पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, आज त्याच जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. ही माझ्यासाठी आणि सर्वांसाठीच खूप मोठी आणि अत्यंत भावुक करणारी गोष्ट आहे.” दादांच्या आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता.

- Advertisement -

“बिलाला पाठिंबा देणे म्हणजेच थेट देशाशी आणि संविधानाशी प्रतारणा…”, नताशा आव्हाडांच्या आक्षेपावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

त्यांचे विचार आणि विकासासाठीची तळमळ प्रत्येक माणसाच्या मनात जिवंत राहील
सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या, ‘मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. दुःखाने खचून न बसता आदरणीय दादांच्या अपूर्ण स्वप्नांची जबाबदारी घेऊन मी आपल्यासमोर उभी आहे. त्यामुळे मी खचणार नाही आणि मागे तर बिलकूलच पाहणार नाही,’ सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अजितदादांची शिस्त, त्यांचे विचार आणि विकासासाठीची तळमळ प्रत्येक माणसाच्या मनात जिवंत राहील, याची खात्री आहे. काही माणसांच्या जाण्याने एक घर रिकामे होते, तर काही माणसांच्या जाण्याने संपूर्ण काळ पोरका होतो. दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला, अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

दादा, तुमचा प्रवास अर्धवट राहिला असेल; पण तुमच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण करू
‘दादा, तुमचा प्रवास अर्धवट राहिला असेल; पण तुमच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण करू,’ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. अजित पवार यांच्या विकासकामांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकरी हा अजित पवार यांच्या कामाचा केंद्रबिंदू होता. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देणे आणि त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे, हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्या म्हणाल्या. तसेच पुणे जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने करण्याचा, जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आणि अजित पवार यांनी सुरू केलेली विकासाची वाट पुढे नेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.

अमित शाहांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून, आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस होता. त्यांच्याच हस्ते दिवंगत अजित पवार यांच्या या अर्धाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते, मंत्री आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Amit Shah : अजितदादांनी महायुतीत जाण्याचा निर्णय का घेतला? अमित शाहांनी...

0
पुणे | Pune राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत महायुतीसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक मोठा भूकंप होता....