Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजसुनेत्रा पवार थेट मोदीबागेत; थोरल्या पवारांची भेट की आणखी काही?

सुनेत्रा पवार थेट मोदीबागेत; थोरल्या पवारांची भेट की आणखी काही?

मुंबई । Mumbai

राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) दिवसागणिक नव्या घडामोडी घडत असून, राष्ट्रवादीचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chaggan Bhujbal) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी भेट घेतली.

- Advertisement -

त्यांची बंद दाराआड तास-दीडतास चर्चा झाली. त्यानंतर नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे. त्यातच आज अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) मोदीबागेत दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

मोदीबागेतील निवासस्थानी आज शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) असताना सुनेत्रा पवार देखील मोदी बागेमध्ये दाखल झाल्या होत्या. तब्बल तासभर सुनेत्रा पवार तिथे होत्या. मात्र यावेळी सुनेत्रा पवार यांनी कोणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता आहेत.

हे देखील वाचा :  पावसात फिरायला गेले आणि अडकले; अंजनेरी गडावरचा रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक Video आला समोर

जवळपास तासभर तिथे थांबल्यानंतर सुनेत्रा पवार तेथून रवाना झाल्या. यावेळी त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भेट घेतली का? याबद्दल चर्चा रंगली आहे. दरम्यान सुनेत्रा पवार अजित पवारांच्या बहिणीला भेटण्यासाठी आल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

शरद पवार यांना भेटण्यासाठी अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ सोमवारी गेले होते. त्यांनी मुंबईतील सिल्वर ओकमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी ओबीसी-मराठा आरक्षणावर राज्यात सुरु असलेल्या वादावर पुढाकार घेण्याची विनंती छगन भुजबळ यांनी पवारांना केल्याचे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : शरद पवारांसोबत भेटीत काय चर्चा झाली? भुजबळांनी पत्रकार परिषदेत सगळचं सांगितलं

या भेटीत राजकारणावर कोणतीच चर्चा झाली नाही, असा दावा भुजबळ यांनी केला. परंतु त्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार पुण्यात शरद पवार यांच्या निवासस्थानी गेल्या आहे. यामुळे राजकारणात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...