Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : पावसात फिरायला गेले आणि अडकले; अंजनेरी गडावरचा रेस्क्यू ऑपरेशनचा...

Nashik News : पावसात फिरायला गेले आणि अडकले; अंजनेरी गडावरचा रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक Video आला समोर

नाशिक | Nashik

- Advertisement -

काल त्र्यंबकेश्वर परिसरात (Trimbakeshwar) पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नदी,नाले दुथडी भरून वाहतांना पाहायला मिळाले. अशातच काल रविवारचा दिवस असल्याने पावसांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी गडावर (Anjaneri Fort) फिरायला आले होते. मात्र, मुसळधार पाऊस सुरु असल्याने तब्बल १० पर्यटक गडावर अडकून पडले. त्यामुळे या पर्यटकांसाठी सहा तास रेस्क्यू ऑपरेशन राबवल्यानंतर त्यांची सुटका करण्यात पर्यटन विभागाला यश आले.

हे देखील वाचा : Nashik Accident News : कसारा घाटात कंटेनरची सहा ते सात वाहनांना धडक

नुकताच हे पर्यटक (Tourist) अडकल्याचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यात अंजनेरी गडाच्या पायऱ्यांवर वेगाने पावसाचे पाणी वाहतांना दिसत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे साधारण १० च्या आसपास पर्यटक गडावर अडकले होते. या पर्यटकांना या पाण्यामुळे गडावरून खाली उतरताच येत नव्हते. त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी वनविभागाच्या पथकाला पाचारण केले होते. यावेळी वनविभागाच्या पथकाने तब्बल ६ तास रेस्क्यू ऑपरेशन राबवून या पर्यटकांची सुटका केली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दहशत माजविणाऱ्या गुंडांची टोळी गजाआड

दरम्यान, अंजनेरी गडावर जाताना काल पर्यटकांना सुरक्षारक्षक (Security Gard) आणि वनविभागाने (Forest Department) कारवाई करुन रोखले होते. मात्र, कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून, भांडण करुन पर्यटकांनी गडावर जाणे सुरुच ठेवले. यावेळी पर्यटकांना सातत्याने वनविभागांकडून आवाहन करण्यात येत होते की पुढे धोका आहे, अपघात होवू शकतो पण पर्यटकांनी एकही न ऐकता गडावर जाणे पसंत केले. त्यानंतर मुसळधार पाऊस झाल्याने हे पर्यटक तिथेच अडकून पडले. यानंतर गडाच्या पायऱ्यांवरुन रौद्र रुपाने पाणी धावू लागले होते. हे दृष्य पाहून पर्यटकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी दाखल होऊन मानवी साखळीच्या सहाय्याने या पर्यटकांची सुटका केली. त्यामुळे सर्व पर्यटकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या