Friday, November 22, 2024
Homeराजकीयअजितदादा, भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाचा संकल्प - तटकरे

अजितदादा, भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाचा संकल्प – तटकरे

येवला | प्रतिनिधी | Yeola

बळीराजाच्या विकासासाठी सत्तेत राहणे तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी अजितदादा पवार (Ajit Pawar) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आपण सहभागी झालो आहोत. राज्यातील जनतेच व्यापक हित जपत राज्याचा विकास करण्याचा निर्णय आपण सर्वांनी घेतला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केले. शहरातील राधा कृष्ण लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची सन्मान यात्रा सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. 

- Advertisement -

यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष, सुरज चव्हाण, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे,विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पगार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, ज्येष्ठ नेते अरुण थोरात मंचावर उपस्थित होते.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : अजित पवारांसह ४१ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वावरत आहे. स्व.यशवंतराव चव्हाण यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम केलं जातं आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतेच्या विचारांवर आपण वाटचाल करत असून सत्तेत सहभागी होऊन आपण याच विचारांवर कायम आहोत आपली वैचारिक भूमिका तुसभरही बदललेली नाही असे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यावेळी ठामपणे सांगितले.बळीराजाच्या विकासासाठी सत्तेत राहणे तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आपण सहभागी झालो आहोत. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली येवल्यासह नाशिक जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची विकास कामे करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली यापुढेही विकासाची कामे होतील.महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण विकास कामे आपण केली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कुठलीही लाट नाही तर केलेल्या विकास कामांना जनतेचा पाठिंबा असणार आहे. 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या (Farmer) मनात राग असल्याने त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. राज्यातील महिला, युवक, शेतकरी यांच्यासह विविध घटकांसाठी कोट्यावधी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. अधिक धाडसी निर्णय अजितदादा पवार यांनी घेतल्याने विरोधकांना त्याची धडकी भरली आहे. त्यामुळे अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी या वेळी सांगितले. तसेच दि.१९ ऑगस्ट रक्षाबंधन च्या दिवशी दोन महिन्यांचे पैसे माता भगिनीच्या खात्यात जमा होईल. जनसंवाद यात्रा लवकरच महाराष्ट्र भर काढण्यात येणार आहे.  जनतेच व्यापक हित जपत राज्याचा विकास करण्याचा निर्णय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. विविध विकास कामांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास निर्माण करण्यासाठी जनसंवाद यात्रा काढण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Rahul Gandhi : “देशातील जनतेला केंद्र सरकारकडून चक्रव्यूहात अडकविण्याचे काम सुरु”; राहुल गांधींचा हल्लाबोल

दरम्यान, या सभेस येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, हुसेन शेख, महिला अध्यक्ष राजश्री पहिलवान,सुरेखा नागरे, दत्तूपंत डुकरे,शेखर होळकर, दत्ता रायते, शिवाजी सुपनर, बाळासाहेब पुंड, सचिन दरेकर, डॉ.श्रीकांत आवारे, मच्छिंद्र थोरात, अशोक नागरे, डॉ.चंद्रशेखर क्षत्रिय, प्रवीण बनकर, गौरव गोवर्धने, चेतन कासव, विलास गोऱ्हे, सीमा गायकवाड, सचिन सोनवणे, नितीन गायकवाड, सुभाष गांगुर्डे, गोटू मांजरे, सोहिल मोमीन, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, सुमित थोरात, भूषण लाघवे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या