Thursday, September 19, 2024
HomeराजकीयSunil Tatkare : जयंत पाटलांच्या 'त्या' टीकेला सुनील तटकरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, "लाडकी...

Sunil Tatkare : जयंत पाटलांच्या ‘त्या’ टीकेला सुनील तटकरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “लाडकी बायको…”

नाशिक | Nashik

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

हे देखील वाचा : Maharashtra Governor : सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल; रमेश बैस यांची उचलबांगडी

यावेळी बोलतांना तटकरे म्हणाले की, अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या दहावा अर्थसंकल्प (Budget) मांडला आहे. राज्याच्या अर्थकारणाला, सर्वांना विकास देणारा अर्थसंकल्प राज्याची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच मांडला गेला आहे. अजित पावर यांची जनसन्मान यात्रा आम्ही नाशिकमधून सुरू करत आहोत. या यात्रेला ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात होत आहे. माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा योजना यांची माहिती या यात्रेतून देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न देखील आम्ही जाणून घेणार आहोत. या यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे देखील वाचा : पंकजा मुंडे, मिलिंद नार्वेकरांसह विधानपरिषदेच्या ११ सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ

जयंत पाटील यांच्या ‘त्या’ टीकेला तटकरेंचे प्रत्युत्तर

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नाशिक दौऱ्यावर असताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ’ योजनेवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच सरकारने आता फक्त ‘लाडकी बायको योजना’ आणायची बाकी असून ती देखील आणावी”,असेही पाटील म्हणाले होते. त्यानंतर आता जयंत पाटील यांच्या या टीकेला सुनील तटकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ‘लाडकी बहीण ऐवजी लाडकी बायको’ योजना आणा असे म्हणणाऱ्या जयंत पाटील यांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका त्यांनी जयंत पाटील यांच्यावर केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या