Friday, May 3, 2024
Homeनगरसुपा औद्योगिक वसाहतीत कंत्राटदारावर कोयत्याने हल्ला

सुपा औद्योगिक वसाहतीत कंत्राटदारावर कोयत्याने हल्ला

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

बांधकाम साहित्याच्या (Construction Materials) किंमतीच्या वादातून (Dispute) तीघांनी बांधकाम कंत्राटदारावर (Construction Contractor) कोयता तसेच हॉकी स्टीकने प्राणघातक हल्ला केल्याची (Koyta Attack) घटना सोमवारी (दि.15) सकाळी सुपा औद्योगिक वसाहतीतील (Supa Industrial Estate) एका कंपनीच्या गेटसमोर घडली.

- Advertisement -

रविवारी कर्मचार्‍यांना कामावर बोलावू नका

जयेश गायकवाड (रा. लाटेओळी, शिरूर, जि. पुणे), कृष्णा विठ्ठल मुरवदे (रा. करुंद, ता. पारनेर) व एक अनोळखी व्यक्त अशी गुन्हा दाखल (Filed a Case) झालेल्या संशयितांची नावे आहेत. या घटनेत शुभम राघु पाठक (रा. कुकडी कॉलनी, शिरूर) असे जखमी (Injured) झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुपा येथील औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत पाठक यांचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी सकाळी त्यांना गायकवाड याचा फोन आला.

सुगंधी गुटख्यासह सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

आपण बांधकाम साहित्य पुरवतो. तुम्हालाही योग्य दरात देऊ यासाठी चर्चा करण्यासाठी भेटण्याचा आग्रह केला. पाठक यांनी त्यांना सुपा (Supa) येथील सुमारासमिंडा कंपनी समोर बोलावले. सकाळी साडेनऊच्या सुमारास गायकवाड अन्य दोघांसह तेथे पोहचला. कंपनी गेटच्या बाजुला ते बोलत असताना बांधकाम साहित्याच्या किंमतीवरून त्यांच्यात वाद (Dispute) झाले.

क्रेनच्या धडकेत वृद्ध महिला ठार

यातून गायकवाड व मुरवदे याने थेट पाठक यांच्यावर हॉकी स्टीक (Hockey Steak) तसेच गायकवाड याने कोयत्याने हल्ला (Koyta Attack) करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व पळून गेले. पाठक यांच्यावर सुपा (Supa) येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तीघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार भिंगारदिवे करत आहेत.  

वाळू धोरणाची अंमलबजावणी जनतेच्या सहकार्याने यशस्वी होईल – ना. विखे

- Advertisment -

ताज्या बातम्या