Friday, May 3, 2024
Homeनाशिकअ‍ॅम्पोटेरीसीन इंजेक्शन पुरवठ्यासाठी गडकरींना साकडे

अ‍ॅम्पोटेरीसीन इंजेक्शन पुरवठ्यासाठी गडकरींना साकडे

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढून ३२५ च्या घरात पोहोचली आहे. उपचारासाठी आवश्यक असलेल्या अ‍ॅम्पोटेरीसीन इंजेक्शन्सचा पुरवठा कमी आहे. इंजेक्शन्सचा मुबलक पुरवठा उपलब्ध करून द्यावा, असे साकडे नगरसेविका प्रा. डॉ. वर्षा भालेराव यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना घातले आहे…

- Advertisement -

म्युकरमायकोसिसच्या प्रत्येक रुग्णास दररोज किमान चार इंजेक्शन्स लागतात. परंतु रुग्णांची वाढती संख्या आणि इंजेक्शन्सची उपलब्धता यांचा ताळमेळ बसत नसल्याने गेल्या आठवड्यात रुग्णास रोज एक याप्रमाणे इंजेक्शन देण्यात आले.

इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचा आजार आणखी बळावत चालला आहे. अनेक रुग्णांना त्यांचे अवयव गमवावे लागण्याची वेळ येत आहे. त्यामुळे इंजेक्शन्सचा पुरवठा मुबलक प्रमाणात करून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी विनंतीही डॉ. वर्षा भालेराव यांनी केली आहे.

अ‍ॅम्पोटेरीसीन इंजेक्शनचा पुरवठा जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्यात होत आहे. त्यामुळे मेडिकल स्टोअर्सला साठा उपलब्ध नाही. शासन स्तरावरूनच या इंजेक्शनचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शनच्या शोधात वणवण फ़िरत आहेत.

आपण स्वतः या विषयात लक्ष देऊन नाशिक जिल्ह्यासाठी अ‍ॅम्पोटेरीसीनचा मुबलक साठा उपलब्ध करून द्यावा, असे निवेदनात म्हंटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या