Thursday, January 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSupreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधिशांना संपत्ती जाहीर करावी लागणार

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधिशांना संपत्ती जाहीर करावी लागणार

दिल्ली | वृत्तसंस्था Delhi

न्यायपालिकेत पारदर्शकता राहावी आणि लोकांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास राहावा यासाठी सुप्रीम कोर्टानं मोठी पावलं उचलली आहेत. सुप्रीम कोर्टाच्या सर्व न्यायाधिशांना पदग्रहण करतानाच आपली संपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सुप्रीम कोर्टाच्यावतीनं हा निर्णय कोर्टातील मिटिंगमध्ये घेण्यात आला आहे. यावेळी एक ठराव मंजूर करण्यात आला, जो आता भविष्यातील न्यायाधिशांसाठी देखील लागू असणार आहे.

- Advertisement -

न्यायाधिशांना हे देखील सांगितलं की, संपत्तींची माहिती सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील अपलोड केली जाईल, पण वेबसाईटवर संपत्तीची घोषणा करणं हे ऐच्छिक असणार आहे. यापार्श्वभूमीवर भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासह सुप्रीम कोर्टाच्या ३० न्यायाधिशांनी आपल्या संपत्तीचं घोषणापत्र कोर्टात दिलं आहे.

YouTube video player

वरिष्ठ वकील आदिश अग्रवाल यांनी बोलताना सांगितले की, आम्ही सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयाचे स्वागत करतो ज्यामध्ये न्यायाधिशांना आपली संपत्ती अधिकृत वेबसाईटवर घोषित करण्यास सांगितलं आहे. यामुळे जनतेचा विश्वास न्यायाव्यवस्थेवर कायम राहील, मला विश्वास आहे की, हायकोर्टचि न्यायाधिश देखील याचं पालन करतील. यामुळे कोर्टात पारदर्शिता आणि विश्वास दृढ होईल, तर १९७७मध्ये याच प्रकारच्या ठरावावर चर्चा झाली होती. पण याला पूर्णपणे लागू करण्यात आलं नव्हतं.

ताज्या बातम्या

AMC Election : शिवसेनेचा गड की भाजप-राष्ट्रवादीची मुसंडी?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगरच्या मध्यवर्ती शहराचा भाग हा पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात शिवसेनेला सोबत घेऊनच यापूर्वी भाजपला काही प्रमाणात यश मिळाले होते....