Friday, April 25, 2025
Homeमुख्य बातम्याMaharashtra Politics : अजित पवारांसह ४१ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Maharashtra Politics : अजित पवारांसह ४१ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

शिवसेना-राष्ट्रवादीच्या सुनावणीबाबत घेतला 'हा' निर्णय

नवी दिल्ली | New Delhi

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या याचिकांवर एकत्रच सुनावणी घेण्याचा निर्णय दिला. त्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांसह प्रकरणाशी संबंधित इतरांना नोटीस बजावली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : “समित कदम देवेंद्र फडणवीसांचा खास”; फोटो दाखवत अनिल देशमुख म्हणाले, “त्याला वाय दर्जाची सुरक्षा…”

तसेच आजच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification) प्रकरण आणि राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरण एकाच दिवशी ऐकू असेही मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी म्हटले आहे. याशिवाय पुढची सुनावणी एकापाठोपाठ ऐकू असे म्हणत न्यायालयाकडून अजित पवार आणि त्यांच्यासह गेलेल्या आमदारांना नोटीसही पाठविण्यात आली आहे.

हे देखील वाचा : “महाराष्ट्रात मणिपूरसारखी स्थिती…”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

दरम्यान, याप्रकरणी पुढील सुनावणी ही ३ सप्टेंबर रोजी होणार आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी तसेच शिवसेना (NCP and Shivsena) आमदार अपात्रतेची सुनावणी झालेली नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सुनावणीत न्यायालय (Court) मोठा निर्णय देणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...