नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नीट परिक्षांसदर्भात आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. कोणत्याही परीक्षेसाठी सुरुवातीच्या टप्प्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत अनेक टप्पे कोर्टाने सुचवले आहेत. समितीने या दिशेने अभ्यास करून आपल्या सूचना द्याव्यात, असे न्यायालयाने म्हटले आहे. समितीने या दिशेने अभ्यास करून आपल्या सूचना द्याव्यात, असे न्यायालयाने म्हटले आहे.
NEET UG 2024 प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणात आता सुप्रीम कोर्टाने या परीक्षेवरील शंका दूर केली आहे. पेपर फुटीनंतर ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. न्यायालयाने याप्रकरणात आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत की पेपरचे कोणतेही ’सिस्टीमॅटिक ब्रीच’ झाले नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आणि अनेक वादांवर पडदा टाकला. आता ही परीक्षा पुन्हा होणार नाही, तर परीक्षेत देशात सगळीकडेच गोंधळ उडाला, पेपर लीक झाला हा आरोप न्यायालयात टिकला नाही, हे स्पष्ट झाले.
तसेच, पेपर मोठ्या प्रमाणावर फुटला नसून परीक्षेचा पेपर पटना, हजारीबाग पर्यंत मर्यादित होते. परीक्षा घेताना पद्धतशीर चुका झाल्या, असे म्हणता येणार नाही. आमचा निर्णय कोणाला पटला नसेल, तर तो हायकोर्टात जाऊ शकतो. एनटीएने भविष्यात काळजी घ्यावी, अशा प्रकारचा निष्काळजीपणा टाळावा असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे.
हे ही वाचा : वेषांतरांच्या आरोपांवर अजितदादा भडकले; म्हणाले, तर मी राजकारण सोडेन…
परीक्षा प्रणालीतील सायबर सुरक्षेतील कमकुवतपणा शोधण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत करण्याची गरज असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. पेपर लीक केवळ पाटणा आणि हाजारीबाग पुरते मर्यादीत होते. यात कोणतेही सिस्टमॅटिक ब्रीच झालेले नाही. म्हणजे यात नियोजनबद्धरीत्या पेपर फोडण्यात आले नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
न्यायालयाने म्हटले आहे की, एजन्सीने प्रश्नपत्रिका सेट केल्यापासून परीक्षा पूर्ण होईपर्यंत कठोर तपासणीची खात्री करावी. प्रश्नपत्रिका इत्यादी तपासण्यासाठी एसओपी बनवावी. कागदपत्रांची वाहतूक करण्यासाठी खुल्या ई-रिक्षांऐवजी रिअल टाईम लॉक असलेली बंद वाहने वापरावीत. याशिवाय गोपनीयतेचे कायदेही लक्षात ठेवले पाहिजेत जेणेकरून काही अनियमितता असेल तर ती पकडता येईल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा