Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! कोलकाता बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल

मोठी बातमी! कोलकाता बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल

'या' तारखेला होणार सुनावणी

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

पश्चिम बंगालमधील आर.जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार (Rape) आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या (Murder) घटनेने देशभरात संतापाची लाट पसरली आहे.या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली असून या घटनेविरोधात देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थीही आंदोलन (Agitation) करत आहेत. अशातच आता या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दखल घेतली आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Weather : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

एएनआयने या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून याप्रकरणाची दखल घेतली आहे. यावर मंगळवारी (दि. २० ऑगस्ट २०२४) रोजी सुनावणी पार पडणार आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड (D.Y. Chandrachud) आणि न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.

दरम्यान, शनिवार (दि. १७ ऑगस्ट) रोजी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका (Petition) दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीशांना पाठवलेल्या या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर आज या याचिकेची न्यायालयाने दखल घेतली असता मंगळवारी (दि. २० ऑगस्ट २०२४) रोजी सुनावणी (Hearing) होणार असल्याचे सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दंगल प्रकरणी ३०० जणांवर गुन्हे दाखल; २० समाजकंटक अटकेत

नेमकं प्रकरण काय?

शुक्रवार दि.९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आर.जी.कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. यानंतर पोलीस दहाच्या सुमारास घटनास्थळी आले. पीडितेच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. सुरुवातीला रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी याला आत्महत्या असल्याचे म्हटले होते, परंतु नंतर शवविच्छेदन अहवालात बलात्कार करून हत्या केल्याचे समोर आले. यानंतर कोलकाता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी संजय राय याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्हा मान्य केला. पुढे हे प्रकरण कलकत्ता उच्च न्यायालयात पोहोचले. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले. या प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत सुमारे २० जणांची चौकशी केली आहे.तसेच सीबीआयच्या पथकाने आर.जी. कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या व रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये आणि बाहेर 3D लेझर मॅपिंगची तपासणी केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या