Tuesday, September 17, 2024
Homeनाशिकलोकसभेतील पराभवामुळे सरकारला लाडकी बहीण आठवली - खा. सुळे

लोकसभेतील पराभवामुळे सरकारला लाडकी बहीण आठवली – खा. सुळे

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

- Advertisement -

कर्तृत्ववान व प्रामाणिक खासदार दिंडोरीकरांनी (Dindori) या भारताला दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम दिंडोरीकरांचे आभार मानते. राज्यातील महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील सरकार बदलायची आता वेळ आली असल्याचे सांगून बहिण आणि भाऊ यांच्या नात्याला मोल लावणार्‍या सरकारला बहिण भावाचं प्रेम समजूच शकत नाही अशी टिका करत जोपर्यंत महाराष्ट्राची तहाण भागणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा एक थेंबही इतरत्र जावू देणार नसल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले.

हे देखील वाचा : Nashik Rain News : अवघ्या तासाभराच्या पावसाने नाशिकमध्ये रस्ते तुंबले

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) जऊळके-दिंडोरी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व बहुद्देशीय हॉल इमारत लोकार्पण सोहळा कार्यक्रमाप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्याने आज महाराष्ट्र सरकारला लाडकी बहिण आठवली . सगळ्या वस्तूंना टॅक्स लावत लाडकी बहिण योजना आणली. दाजींच्या खिशाला कात्री लावली आणि लाडकी बहिण योजना आणली. हे कितपत योग्य आहे? हे सरकार येणार्‍या विधानसभा निवडणुकीत घालवायचे आहे. कपटनितीने नाही तर लोकशाही पद्धतीने आपण सत्तेत येऊ असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. आपल्याला सरकार सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी स्थापन करायचं असल्याचेही नमूद करत जोपर्यंत महाराष्ट्राची तहाण भागणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा एक थेंबही इतरत्र जावू देणार नाही असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

हे देखील वाचा : “…तर त्याक्षणी मी राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”; देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भास्कर भगरे (MP Bhaskar Bhagare) होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड आणि जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, कादवा कारखाना संचालक शहाजी सोमवंशी, दिंडोरी बाजार समिती सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे, संचालक दत्तू भेरे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा संगीता पाटील, दिंडोरीच्या माजी नगराध्यक्षा मेघा धिंदळे, तालुकाध्यक्षा शैला उफाडे, भीमाबाई जोंधळे, संतोष रहेरे, नरेश देशमुख, विठ्ठलराव अपसुंदे, वसंत थेटे आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा : Nashik Trimbakeshwar News : तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकला भाविकांची मांदियाळी

यावेळी अध्यक्षीय मनोगतात खासदार भास्कर भगरेे यांनी देखील मतदारसंघातील द्राक्ष, कांदा आदी पिकांबरोबरच शेतीच्या समस्येवर प्रकाशझोत टाकला. त्याचबरोबर पाण्याच्या प्रश्नावर देखील सरकारचा दुटप्पीपणा भगरे यांनी स्पष्ट करून सांगितली. संसदरत्न सुप्रिया ताईंच्या मार्गदर्शनाने आपण मतदार संघातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आपण करत असून त्यासाठी सुप्रिया ताईंचे विशेष सहकार्य असल्याचे खा. भगरे यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड आणि जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

हे देखील वाचा : मोठी बातमी! नाशकात एटीएसची कारवाई; बांगलादेशी घुसखोर ताब्यात

दरम्यान, कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच भारती जोंंधळे, सदस्य अंबाबाई बागुल, भगवान गोतरणे, आरुणा वाघ, पोलिस पाटील श्रीधर गांगुर्डे, ग्रामसेवक हिरालाल पाटील, रावसाहेब जोंधळे, सोमनाथ बोरस्ते, निवृत्ती जोंधळे, कोंडाजी जोंधळे, दत्तु जोंधळे, पुंडलिक गायकवाड, खंडेराव शिरसाट, अजय सिंग, बि.के, मौर्या, गोविंद शिरकांडे, अनिल ईचाळ, दिलीप देवरे, अरुण चौरे, मनोज यादव, योगेश शिरसाट, संजय प्रसाद, शंकर जोंधळे, आकाश जोंधळे, मुकेश गांगुर्डे, शेकर गांगुर्डे, महेश गांगुर्डे, विकास गांगुर्डे,कचरु गांगुर्डे, गौतम गांगुर्डे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक उपसरपंच तुकाराम जोंधळे यांनी केले. सुत्रसंचालन प्रवीण जोंधळे यांनी केले तर आभार रायुकॉ जिल्हाध्यक्ष शाम हिरे यांनी मानले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या