Saturday, April 26, 2025
Homeमुख्य बातम्या"…तर त्याक्षणी मी राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन"; देवेंद्र फडणवीसांचे मोठे...

“…तर त्याक्षणी मी राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”; देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

मुंबई | Mumbai

राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलकांकडून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाड्या अडवून किंवा थेट व्यासपीठावर जाऊन मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय असे प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे नेत्यांची चांगलीच कोंडी होतांना पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून निशाणा साधत आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! नाशकात एटीएसची कारवाई; बांगलादेशी घुसखोर ताब्यात

काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत काम करुन इच्छितात पण देवेंद्र फडणवीस त्यांना हे काम करु देत नाहीत, असा गंभीर आरोप केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देतांना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) आपल्या आगामी राजकीय वाटचालीबाबत मोठे विधान केले आहे. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जर म्हटले की, मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मी तो प्रयत्न मी थांबवला तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”, असे देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटले.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची जोरदार हजेरी; रस्त्यांवर पाणीच पाणी

तसेच “आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले ते एकतर मी केले नाहीतर शिंदेंनी केले. एकनाथ शिंदेंच्या पाठिशी मी भक्कपणाने उभा राहिलो आहे. परंतु, अशाप्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे.आता मी पुन्हा एकदा सांगतो की जर मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की त्यांना मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. पण त्यामध्ये मी अडथळा आणला, मी निर्णय होऊ दिला नाही, तर त्याच क्षणी राजीनामा (Resign) देईल आणि राजकारणामधूनही सन्यास घेईल”, असे देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...