Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSupriya Sule: आजही डोळे बंद केले की…; सांगता सभेत सुप्रिया सुळे भावूक,...

Supriya Sule: आजही डोळे बंद केले की…; सांगता सभेत सुप्रिया सुळे भावूक, म्हणाल्या, मतदान होईल ते विक्रमी मतदान…

बारामती | Baramati
बारामती पोटनिवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून आज (मंगळवारी, ता. 21) सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सांगता सभा होत आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार सांगता सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. महाविकास आघाडीच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी भाषण करताना त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन बारामतीकरांना केले.

बारामती पोटनिवडणुकीसाठी बारामतीत आज सांगता सभा पार पडत आहे. सभेसाठी मोठी तयारी करण्यात आली असून राज्यातील प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. यावेळी सुप्रिया सुळे बोलताना भावनिक झाल्याचे पहायला मिळाले.

- Advertisement -

हा कार्यक्रम दुःखाचा आहे
“आपला भाऊ आपल्यात नाही, हे आयुष्यभर आपल्या मनात राहत. हा कार्यक्रम दुःखाचा आहे, सुनेत्रा वाहिनी, पार्थ आणि जय पवार यांच्यावर अचानक पडलेली जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. महाविकासआघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा मोठ्या ताकदीने सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे उभे राहणार आहे,” असा शब्द खासदार सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिला.

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, विरोधी पक्षाचा बुरखा फाडणार, आम्ही हिंदू आहोत; उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी माझी इच्छा होती
अजित पवार यांनी पूर्ण निष्ठेने 35 वर्ष बारामतीकरांची सेवा केली. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी माझी इच्छा होती. म्हणूनच निवडणूक जाहीर होताच, पहिल्या दिवशी आम्ही कोणताही उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले होते. पण, अर्थात असे झाले नाही. पण आता जे मतदान होईल, त्यामध्ये विक्रमी मतदान होईल यामध्ये शंका नाही,” असे म्हणत त्यांनी मोठा विश्वास व्यक्त केला.

आजही डोळे बंद केले की तो दिवस आठवतो
अजितदादांच्या विमान अपघाताच्या दिवसाची आठवण सांगताना सभेत शांतता पसरली होती. “सकाळी वेळ होती, जेव्हा पार्थचा फोन आला. त्याने सांगितलं ‘डॅडींचं प्लेन पडलंय’. मला विश्वासच बसत नव्हता. आजही डोळे बंद केले की तो दिवस आठवतो. त्या दिवशी अपघातग्रस्त विमान पाहण्याची हिंमतही माझ्यात नव्हती. आजही असे वाटते की दादा त्या विमानातून चालत बाहेर येतील, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. आज तो कर्ता पुरुष आपल्यात नाही, हे दुःख आयुष्यभर काळजात राहणार आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आणि दादांना आदरांजली वाहा
“बारामती आणि पवार कुटुंबाचे नाते सहा दशकांचे आहे. बारामतीकरांनी कधीही पवारांची साथ सोडली नाही. आता दादांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर त्यांचे बारामतीसाठीचे स्वप्न आपल्याला एकत्र मिळून पूर्ण करायचे आहे. एक नंबरचे बटण दाबून वहिनींना विजयी करा आणि दादांना आदरांजली वाहा,” असे आवाहन सुळे यांनी यावेळी केले. या सभेत सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या वतीने महाविकास आघाडीचा पूर्ण पाठिंबा सुनेत्रा पवार यांना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा वहिनींच्या नावाच्या समोरचं चिन्ह दाबून त्यांना मतदान करा. वहिनींना शब्द देते महाविकास सगळे नेते आणि कार्यकर्ता त्याच्या मागे उभा राहणार आहे. दादांची जी बारामतीची स्वप्न आहेत ती आपण सगळे मिळून पूर्ण करू. दादांची आन ,बान ,आणि शान ही संपूर्ण राज्यात टिकून ठेवण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे, असंही पुढे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...