Saturday, April 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, विरोधी पक्षाचा बुरखा फाडणार, आम्ही हिंदू...

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, विरोधी पक्षाचा बुरखा फाडणार, आम्ही हिंदू आहोत; उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai
महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रनचेवरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजप सरकारवर कडाकडून हल्लाबोल केला आहे. भारतीय कामगार सेनेच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्य आणि देशातील राजकीय परिस्थिती, कामगार क्षेत्रातील मक्तेदारी आणि केंद्रातील भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. तसेच, राज्यातील महिला अत्याचारांवरुन फडणवीसांवरही जोरदार टीका केली.

आपण जी दिशा पकडली आहे, त्यावरुन पुढील वाटचाल होणार आहे हाच आपल्या वार्षिक सभेचा हेतू आहे. दत्ताजी यांचे नाव घ्यायलाच पाहिजे. सन १९६६ साली शिवसेना स्थापन झाली आणि दरवाज्याची बेल वाजली आणि दत्ता साळवी आले आणि म्हणाले नोकरी सोडून तुमच्यासोबत काम करणार. बाळासाहेब म्हणाले इकडे काही नाही, काळोख आहे, तरी ते म्हणाले तुमच्यासोबत काम करायचे आहे. आज हजारो लाखो लोकांना त्यांच्यामुळे नोकऱ्या मिळाल्यात ही जिद्द होती, याला धाडस, हिंमत आणि जिद्द म्हणतात.” अशी आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली.

- Advertisement -

“दिवस येतात, दिवस जातात. लोक येतात, लोक जातात. त्यांची कर्म आणि पाप त्यांच्यासोबत जातात. आज एकूण वकवक चालली आहे. सगळे मला पाहिजे, असे काहींना वाटतेय. कोणालाही वाटतंय तिकडे जाऊन मला काही मिळतेय, तर जरूर. पण, गेल्यावर एक तिथे गेलेल्या लोकांना विचारा, तुमचा अनुभव काय आहे?” असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

माणसं विकली जात आहेत. युनियन क्षेत्रात दुकानदारी सुरू आहे, असे म्हणत कामगार क्षेत्रातील सद्यस्थितीवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. सगळ्या उद्योगामध्ये माझे मालक ओळखीचे आहेत, पण माझं नातं गेटवर लागलेल्या भगव्याशी आहे, मालकाशी नाही. भगवा सोडून दुसरं फडक आलं तर त्याचा फक्त वापर डोळे पुसायला होईल.

मोदींवर निशाणा
अमेरिका इराण युद्ध सुरु आहे, ते लेझीम सारखं चालू आहे. हे युद्ध कधी थांबणार काय माहिती? बातमी आलेली दुबईमध्ये उत्तर भारतीय काम करत आहे. देश म्हणतोय परत या.. ते म्हणताय देशात येऊन बेकारीने मरण्यापेक्षा आम्ही बॉम्बने मरू. मेलो तरी चालेल पण काम सोडून माझ्या देशात जाणार नाही, असं ते कामगार म्हणताय तरी नेत्यांकडे त्यांचं लक्ष जात नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, विरोधी पक्षाचा बुरखा फाडणार. आम्ही हिंदू आहोत, तुम्ही आम्हाला कशाला बुरखा घालताय. तुमच्या डोक्यावर बुरखा आहे, आमच्या नाही,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी खडसावलं आहे.

मुख्यमंत्री तुम्ही लोकसभेत होतात का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. महिला आरक्षण बद्दल एवढा कळवळा असेल तर संसदेचे उद्घाटन करताना आणि अयोध्या राम मंदिरावेळी राष्ट्रपतींना का बोलवले नाही? त्या आदिवासी आहेत म्हणून का? असेही उद्धव ठाकरे म्हणाले. महिला आरक्षण लागू करा मी आज सुद्धा म्हणतो लागू करा, हा नवा विषय नाही.

Nashik News: राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप

रवीश कुमार यांचा एपिसोड पाहा, काही राज्य कुटुंब नियोजन कार्यक्रम चांगल्याप्रकारे राबवत आहेत. मग, कुटुंब नियोजन करणे गुन्हा आहे? मोहन भागवतांचं चांगलं आहे, मुलं जन्माला घाला? त्यांना पोसणार कोण? कारखाने आणि मिल बंद पडल्या. नुसतं बेकारांचा देश करायचा आहे का तुम्हाला?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

“आज भाजपात अरूण जेटलींच्या पातळीचा कोणी नाही, हे देवेंद्र फडणवीसांचे दुर्दैव आहे. पातळीचा इथे प्रश्न नाही. एवढ्या खालच्या पातळीवर आम्ही येऊ शकत नाही. तिकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जी वाघिणीसारख्या लढत आहेत. ममता बॅनर्जी जिंकल्याच पाहिजेत. २ लाखांवर सीआरपीएफ जवान बंगालमध्ये उतरवले आहेत. मग मतदान कोण करणार? उद्या ममता बॅनर्जी पराभूत झाल्यावर तंगड्या वर करून नाचतील. ही लोकशाही आहे,” असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

योगी आदित्यनाथ, आपले मुख्यमंत्री तिकडे इकडे महिला विनयभंग होतोय, ड्रग्स प्रकरण बाहेर येतय पण यांना बंगाल जिंकायचाय, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा फडणवीसांना टोला लगावला. पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष होतंय, पाकडे कसे आले आणि कुठे गेले कळलं नाही. योगी आदित्यनाथ म्हणाले विवेकानंद बंगालचे सुपुत्र होते, ते म्हणाले तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा. पण, तुमच्या पक्षाचा आणि आझादीचा काय संबध? तुमचा पक्ष जिंकण्यासाठी फौजा घुसवताय, तुमची औकात नाहीये जिंकायची म्हणून तुम्ही ईडी, CBI घुसवताय. 100 दिवस शेळीचं जगण्यापेक्षा 1 दिवस वाघाचं जगा, ईडी CBI बाजूला ठेवा आणि मग शिवसेनेसोबत सामना करा, सध्या हा पुचाटाचा कारभार सुरु आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना सुनावलं.

“सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामशाहीचा भाग देशात आणण्यासाठी फौजा घुसवल्या होत्या. पण, तुम्ही तुमचा पक्ष निवडून आणण्यासाठी फौजा घुसवत आहात. हा वल्लभभाई पटेल आणि तुमच्यातील फरक आहे. म्हणून त्यांना लोहपुरूष म्हणतात. तुमच्यात जिंकण्याची औकात नाही, म्हणून तुम्ही ईडी, सीबीआय आणि फौजा घुसवत आहात निवडणूक जिंकवण्यासाठी. तुम्ही केलेली कामे कमी पडत आहेत का?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

महाराष्ट्राने प्रत्येकवेळी देशाला दिशा दाखवली
“महाराष्ट्राने प्रत्येकवेळी देशाला दिशा दाखवली आहे. देशावर संकट आल्यावर महाराष्ट्र धावून गेला आहे, हा इतिहास आहे. महाराष्ट्रावर अन्याय होत असेल तर बंगालमध्ये बंगाली, तामिळनाडूत तामिळी उभा राहिलाय, तसे मराठी माणसाला महाराष्ट्रीयन म्हणून उभे राहावे लागेल. बाहेरून येताय आणि आमच्यात राहताय, आमचे वैर नाही. तोड-फोडा राज्य करा ही नीती कशासाठी? महिलांच्या आडून भाजपचे राजकारण सुरू आहे. हे वास्तव आहे, तोच विस्तव आहे. यावरून चालू शकणाराच कारभार करू शकतो. तुमच्यात चालण्याची हिंमत नाही. राज्यकर्त्यांची संवेदना मेलीय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या परिस्थितीत आपल्याला काम करायचे आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

शिवाजी महाराज नसते तर राम मंदिर बांधू शकलो असतो? संभाजी महाराज, ताराराणी नसत्या तर काय झालं असतं? औरंगजेब येथे गाडला गेला तो त्यांच्यामुळे. मेलो तरी चालेल, धर्मातर करणार नाही पक्षांतर दूरच. अन्यायला मोडून तोडून टाकणं हा महाराष्ट्र धर्म आहे, हा महाराष्ट्र धर्म देशाला वाचवू शकतो, अशी साद उद्धव ठाकरेंनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने घातली.

ताज्या बातम्या