मुंबई । Mumbai
परभणी रेल्वे स्थानकाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काही दिवसांपूर्वी विटंबना झाली होती. यानंतर उफाळेल्या हिंसाचारप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले होते. यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यू झाला आहे.
तर बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची जुन्या वादातून अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. बीड आणि परभणीत या दोन्ही प्रकरणामध्ये नेमकं काय झालं, याचे उत्तरं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी सरकारवर टीका करणार नाही. महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना निवडून दिलं आहे. मी रोज चॅनल्सवर रुसवे-फुगवे पाहिले आहेत. जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिलं जातं. कामाला लागण्याऐवजी हे सरकार रुसव्या फुगव्यांमध्ये अडकलं आहे. महाराष्ट्रात खूप मोठी आव्हानं आहेत. जीडीपी कमी झाला आहे. राज्यासमोर आणि देशासमोर खूप आव्हानं आहेत. बेकारी, अर्थव्यवस्था यावर या सरकारने गांभीर्याने चर्चा करायला हवी होती पण तसं दिसत नाही. तसंच बीड आणि परभणी या ठिकाणी झालेल्या दोन्ही घटनांचा मी जाहीर निषेध नोंदवते आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे की हा विषय त्यांनीही गांभीर्याने घेतला पाहिजे आणि महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे.
दरम्यान, काल (१५ डिसेंबर) मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळं भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘भुजबळ हे जरी नाराज असले तरी, हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. पण छगन भुजबळ हे जेव्हा शरदचंद्र पवार गटात होते. तेव्हा त्यांचा आम्ही यथोचित मान-सन्मान केला. तसेच त्यांची जागा नेहमी शरदचंद्र पवार यांच्या शेजारी असायची. तसेच, भुजबळ हे जरी नाराज असले तरी, हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. पण ते जेव्हा शरदचंद्र पवार गटात होते. तेव्हा त्यांचा आम्ही यथोचित सन्मान केला. तसेच त्यांची जागा नेहमी शरदचंद्र पवार यांच्या शेजारी असायची. दीड ते दोन वर्षात जे काही झालं त्यात मला पडायचं नाही. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.