Wednesday, November 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजभाऊबीजेच्या दिवशी अजितदादांच्या आठवणींनी सुप्रिया सुळे भावूक; जुना व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या,...

भाऊबीजेच्या दिवशी अजितदादांच्या आठवणींनी सुप्रिया सुळे भावूक; जुना व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, आजच्या दिवशी तुझं…

मुंबई | Mumbai
भाऊबीज म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आठवणींचा सण. मात्र यंदाची भाऊबीज पवार कुटुंबासाठी भावनिक ठरली आहे. दिवंगत अजित पवार यांच्याशिवायची पहिलीच दिवाळी आणि भाऊबीज असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबतच त्यांनी भाऊबीजेच्या जुन्या आठवणींचा व्हिडीओही पोस्ट केला. ‘दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

एकही आंतरराष्ट्रीय उड्डाण नवी मुंबईत हलवणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केंद्र सरकारला पत्र

- Advertisement -

अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिलीच दिवाळी असल्यामुळे पवार कुटुंबीयांनी यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला होता. एरवी दिवाळीच्या काळात न चुकता एकत्र येणारा हा परिवार यंदा मात्र एकत्र दिसला नाही. कुटुंबातील वेगवेगळे सदस्य आपापल्या कामांमध्ये व्यस्त होते तर काही जण मुंबई, बारामतीत होते.

दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली.

आपलं एकत्र येणं, गप्पा, हसणं… आम्हा बहिणींच्या घोळक्यात हरखून गेलेला तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस. तेव्हा अगदी सहज वाटणारे ते क्षण आज किती मोलाचे वाटतात.

दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं मनाला चटका लावून जातं. आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणंही कठीण आहे. तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील ❤️— Supriya Sule (@supriya_sule) November 11, 2026

“दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी
भाऊबीजेच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी लिहिले, “दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली.” आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्या पुढे म्हणतात, “आपलं एकत्र येणं, गप्पा, हसणं… आम्हा बहिणींच्या घोळक्यात हरखून गेलेला तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस. तेव्हा अगदी सहज वाटणारे ते क्षण आज किती मोलाचे वाटतात! दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं मनाला चटका लावून जातं. आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणंही कठीण आहे. तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील.” सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पवार कुटुंबातील भाऊबीजेचे आणि दिवाळीचे जुने कौटुंबिक व आनंदी क्षण पाहायला मिळत असून, ही पोस्ट पाहून राज्यभरातील कार्यकर्ते आणि नागरिकही भावूक झाले आहेत.

ताज्या बातम्या