Friday, November 22, 2024
Homeराजकीय“अमित शाह भ्रष्टाचारावर बोलत होते अन् त्यांच्या पाठीमागं…”, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर!

“अमित शाह भ्रष्टाचारावर बोलत होते अन् त्यांच्या पाठीमागं…”, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर!

मुंबई । Mumbai

भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सरदार कोणी असतील तर ते शरद पवार (Sharad Pawar) आहेत, अशी जहरी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पुण्यातील (Pune) भाजपाच्या (BJP) मेळाव्यात बोलताना केली होती.

- Advertisement -

त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP SP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अमित शाह यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘अमित शाह भ्रष्टाचाराचे आरोप करत होते पण मागे अशोक चव्हाण बसले होते. डर्टी डझन मध्ये कोण कोण आहेत हे माहीत आहे. आमचं चिन्ह आणि पक्ष फोडलेले डर्टी डझन मंत्रिमंडळात आहेत. मोदीजी बारामतीला येऊन गेले. त्यांना मान सन्मान दिला’ असा पलटवार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आम्ही लोकशाहीवाले लोक आहोत. आम्ही दडपशाहीवाले नाहीत. त्याच्यामुळे तो अधिकार अमित शाहांना आहे. शेवटी ते आमचे विरोधक आहेत. ते आमचे गुणगान गाणार नाहीत. आमच्यावर टीकाच करणार आहेत, असा टोला सुप्रिया सुळेंनी भाजपला लगावला.

हे ही वाचा : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी PM मोदी काय म्हणाले?

पुढे बोलताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेबाबतही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. “उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी भाजपाकडे मुद्दे नाहीत. त्यांनी त्यांचा पक्ष फोडला. त्यांचे नेते पळवून नेले, त्यांच्यावर इतका अन्याय झाला. आता त्यांच्यावर बोलण्यासारखं काहीही नाही. त्यामुळे अमित शाह यांच्याकडून अशाप्रकारे टीका केली जात आहे”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

अमित शाह यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

पुण्यात भाजपाच्या दोन दिवस राज्य कार्यकारिणीचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित झाला. यावेळी बोलताना अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सरदार कोणी असतील तर ते शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम शरद पवार यांनी केलं आहे, असं अमित शाह म्हणाले होते.

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकले हरवलेले बाबा; विरोधकांचं टीकास्त्र

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या