Sunday, July 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSupriya Sule: शरद पवारांनंतर सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांचे कान टोचले; म्हणाल्या, ही...

Supriya Sule: शरद पवारांनंतर सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांचे कान टोचले; म्हणाल्या, ही काँग्रेस पक्षाची देणं आहे…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार दिल्यानंतर महाविकास आघाडीत एक वाक्यता नसल्याचे आले. बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. यावरून बराच राजकीय गदारोळ सुरू असून यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी अधिक बोलणे, सल्ला देणे टाळल्याचे दिसत आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ), शिवसेना ( ठाकरे गट ) यांनी उमेदवार नसताना काँग्रेसने उमेदवार दिल्याबद्दल खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ‘काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला आहे’ असे म्हणत टीका केली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसचे स्वतंत्र्यापासूनचे योगदान सांगत आपल्या भाच्याला चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार काँग्रेसमध्ये बराचकाळ होते याची आठवण देखील करून दिली.

- Advertisement -

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्यासाठी बारामती हा भावनिक भाग आहे. पवारांचे नाव मोठे आहे ते बारामतीकरांच्या आशिर्वादाने आहे. अजितदादा हा मोठा भाऊ गमवला आह. त्यामुळे हा आमच्यासाठी मोठा विषय आहे. सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणाऱ्या सगळ्याच पक्षांचे आभार मानत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

Parth Pawar : “धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर…”; पार्थ पवारांच्या ‘डाऊनफॉल’ टीकेला काँग्रेसचे सडेतोड उत्तर

मतभेद असले पाहिजेत, मनभेद असता कामा नये
“विरोधक हा आपला क्षत्रू नसतो. ही लढाई वैचारिक आहे. मतभेद असले पाहिजेत, मनभेद असता कामा नये. राज्यसभेच्या निवडणुकीत सगळ्यांनी समंजस्यपणा दाखवला. अनेक दिवस आम्ही सगळे पक्ष सन्मानाने एकमेकांशी बोलत होतो. त्यातून राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली. बारामतीच्या निवडणुकीत लोकशाही पद्धतीने काँग्रेसने आपली भूमिका घेतलेली आहे. त्यात फार गैर मला वाटत नाही.”

आपण काँग्रेसमुळे मोकळा श्वास घेतोय
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, ‘काँग्रेस पक्ष जर संविधानाच्या चौकटीत राहून काम करत असेल तर काय हरकत आहे. आपण सर्वजण लोकशाहीवर प्रेम करणारे लोकं आहोत. आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्ष हा जवळून पाहिला आहे. मी, अजितदादा.. साहेब काय बराच काळ काँग्रेसमध्येच होते. मी स्वतः काँग्रेसपक्षाबरोबरच लढले आहे. त्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने आणि मतांनीही निवडून आलेली आहे.’ अजित पवार आणि मी सुद्धा काँग्रेसच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेले आहोत. आज आपण मोकळा श्वास घेतोय, ही काँग्रेस पक्षाची देणं आहे. काँग्रेस पक्षाचे योगदान फार मोठे राहिलेले आहे.”

त्याचे संयुक्तिक उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मिळेल
काँग्रेसनं ‘कृतघ्न’ म्हणत पार्थ पवारांवर टीका केली आहे. याबद्दल विचारल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हा प्रश्न मला विचारण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे, त्यांच्या नेत्यांना विचारलं पाहिजे. कारण, त्यांच्या खासदाराचे हे मत आहे. याचा अर्थ त्यांच्या पक्षाचे हे मत असेल. त्यामुळे त्याचे संयुक्तिक उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मिळेल.”

सल्ला ही वेगळी आणि कौटुंबिक सल्ला वेगळी गोष्ट आहे
‘पार्थ पवारांकडे परिपक्वता आहे की नाही, माहिती नाही’ अशी कानउघडणी शरद पवारांनी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानानंतर केली होती. यावर सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारल्यावर, त्यांनी म्हटलं, “शरद पवार हे कर्तृत्त्वाने, वयाने आणि नात्याने माझ्यापेक्षा मोठे आहेत. मोठ्या लोकांनी एखादे वक्तव्य केल्यानंतर आपण जास्त बोलायचे नसते, याच संस्कारात माझ्या आईने आणि कुटुंबाने मला वाढवलं आहे. कौटुंबिक सल्ला हा माध्यमांसमोर नाहीतर घरात दिला जातो. माझ्या मुलांना सल्ला देण्याची वेळ आली तर ती माध्यमांसमोर येऊन सांगणार नाही. माझ्या मुलांना घरात काय सांगायचे ते सांगेन. सल्ला ही वेगळी आणि कौटुंबिक सल्ला वेगळी गोष्ट आहे.”

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेही ओव्हरफ्लो; मुळात 9541 क्युसेकने विसर्ग

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara पाणलोटात आषाढ सरींचे तांडव सुरूच असून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणातून पाणी सोडल्यानंतर आता निळवंडे धरणही काल ओव्हरफ्लो झाले. भंडारदरातून...