Sunday, May 18, 2025
Homeधुळेसुरत-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने

सुरत-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने

धुळे Dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

सुरत-नागपूर महामार्गावरील (Surat-Nagpur highway) फागणे-अजंग-मुकटी-पारोळा या चौपदरीकरणाचे (four-lane work) काम अत्यंत संथगतीने (slow pace) सुरू आहे. या कामाला गती द्यावी. तसेच या सर्व ठिकाणी तात्पुरत्या वळण रस्त्यावर तातडीने डांबरीकरण (Urgent asphalting) करावे, अशी मागणी मुकटी येथील माजी सरपंच सौ. अर्चना पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयाच्या (National Highway Authority Offices) प्रकल्प संचालकांना (जळगाव व धुळे) निवेदन दिले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून सुरत- नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. फागणे ते तरसोद हे काम ऍग्रो इन्फ्रास्ट्रक्चर तसेच फागणे ते नवापूर हे काम जे.एम.म्हात्रे या कंपनीकडून करण्यात येत आहे. सुरूवातीस काम वेगाने सुरू होते. परंतु सद्यस्थितीत कामाचा वेग मंदावला आहे.

सदर टप्पे कामाचे दोन वर्षे कालावधीत काम पूर्ण करणे आवश्यक असताना कामास फारशी गती नसल्याने सदर काम वेळेत पूर्ण होईल, यात शंका आहे. कामे संथ गतीने सुरू असल्याने, अजंग, मुकटी, दळवेल, पारोळा दरम्यान पुलाच्या कामासाठी तात्पुरत्या वळण रस्त्यावर डांबरीकरण न केल्याने, वाहन चालकांना धुळीचा सामना करावा लागत आहे.

तरी सुरत नागपूर महामार्गावरील फागणे- अजंग- मुकटी – दळवेल – पारोळा दरम्यान वळण रस्त्यावर तातडीने डांबरीकरण करावे. महामार्गावरील खड्डे बुजवण्यात यावेत. महामार्गाच्या मध्यभागी झाडांचे सुशोभीकरण करण्यात यावे.

दुतर्फा वृक्ष लागवड करावी. महामार्ग चौपदरीकरणाच्या उर्वरित कामांना गती द्यावी, अशी मागणीही माजी सरपंच सौ.अर्चना उमाकांत पाटील यांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मोठी बातमी! इस्रोची १०१ वी मोहीम अयशस्वी; देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण EOS-09...

0
नवी दिल्ली | New Delhi इस्रोने आज (रविवारी) सकाळी ५.५९ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्राच्या पहिल्या लाँच पॅड (FLP) वरून PSLV-C61...