Saturday, January 24, 2026
Homeनाशिकसुरगाणा : श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

सुरगाणा : श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

सुरगाणा | वार्ताहर Surgana

- Advertisement -

मानवता आणि लोककल्याणकारी शिकवण देणारे श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी पालखी मिरवणूक व महाप्रसाद, ग्रामीण रुग्णालयातील गरजूंना फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

YouTube video player

तेली गल्ली, झेंडा चौक, आझाद लेन, देवी मंदिर या मार्गावरून पालखी सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आला. या वर्षी प्रथमच संताजी युवक मित्र मंडळाच्या वतीने कर्ण कर्कश, कानठळ्या बसविणारा आवाज डीजे मिरवणूकीस फाटा देत श्रीभुवन बर्डा येथील बिरसा कलासंगम पथकाला मिरवणूकी करीता पाचारण करण्यात आले होते. या पथकाने पारंपरिक कहाळी,संबळ,नंदी,शंकर पार्वती,डांगी आदिवासी नृत्य सादर करीत प्रेक्षकांची मने
जिंकली.

कार्यक्रमाचे आयोजन दिनकर पिंगळे, संतोष बागुल, रमेश सोनवणे, रघुनाथ राऊत, मोहन पिंगळे, नामदेव सोमवंशी, निलेश करवंदे, मोहन वाघ, नगरसेविका जयश्री शेजोळे,विजय बागुल, उमेश सोनवणे, निखिल वाघ, प्रसाद बागुल, विशाल सोनवणे, नितेश सुर्यवंशी, देविदास वाघ, विजय सोनवणे, अरुण पवार,मयुर सुर्यवंशी, विशाल सिरसाट, शुभम वाघ, लखन बिरारी, माजी नगराध्यक्षा सोनीलीताई बागुल माजी नगरसेविका शोभाताई पिंगळे, सह संताजी युवक मित्रमंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...