Friday, January 23, 2026
Homeक्रीडाIndvsPak Asia Cup 2025: सामना जिंकल्यानंतर सुर्यकुमारच्या एका कृतीनं जिंकली लाखो भारतियांची...

IndvsPak Asia Cup 2025: सामना जिंकल्यानंतर सुर्यकुमारच्या एका कृतीनं जिंकली लाखो भारतियांची मनं; “पाकिस्तानविरुध्दचा विजय सैन्याला…”

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आशिया कप २०२५ मधील लीग सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आधी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आणि पाकिस्तानला २० षटकांत १२७/९ धावांवर रोखले. त्यानंतर भारताने १५.५ षटकांत केवळ ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. या सामन्यात भारताच्या विजयापेक्षा सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या संघाने हस्तांदोलन न केल्याची घटना सर्वाधिक चर्चेत आली.

हा विजय सर्व शस्त्रदलांना समर्पित
या शानदार विजयानंतर भारतीय टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादवने एक महत्त्वपूर्ण आणि भारतीय चाहत्यांच्या मनाला भिडणारे विधान केले आहे. पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर भारतीय टी-२० संघाच्या कर्णधाराने पहलगाम हल्ल्यातील पीडितांसोबत असल्याचे सांगत हा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित केला. मॅचनंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, “आम्ही पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबायांसोबत उभे आहोत. हा विजय आमच्या सर्व शस्त्रदलांना समर्पित करायचा आहे. ज्यांनी खूप धैर्य दाखवले. तेच आमचे प्रेरणास्थान आहेत.”

- Advertisement -

पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन नाही
सामना संपताच भारताचे फलंदाज सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे थेट ड्रेसिंग रूमकडे निघाले. एवढेच नव्हे तर भारतीय संघातील इतर कोणत्याही खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. त्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू मैदान सोडून निघून गेले. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला.

YouTube video player

गौतम गंभीरच्या विधानाने वेधले लक्ष
भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सामन्यानंतर म्हणाला की, “खरंतर हा मोठा विजय आहे, पण अजूनही या स्पर्धेत खूप क्रिकेट बाकी आहे. आणि हा सामना आमच्यासाठी खुप महत्त्वाचा होता, एक संघ म्हणून आम्हाला पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण करायची होती. त्याशिवाय आमच्या भारतीय सशस्त्र दलाचे ‘ऑपरेशन सिंदूर’साठी आभार मानायचे होते. आम्ही देशाला सतत अभिमान वाटेल अशी कामगिरी करत राहू.”

भारताने पाकिस्तानला नमवले
पाकिस्तान संघाने भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. प्रथम गोलंदाजी आणि त्यानंतर फलंदाजीत भारतीय संघाने अप्रतिम खेळाची प्रदर्शन करत पाकिस्तानचा धुव्वा उडवला. पाकिस्तानकडून १२७ धावांवर रोखत भारताने केवळ १५.५ षटकांमध्ये ३ गडी गमावून १३१ धावा करत ७ गडी राखून सहज विजय गाठला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...