Saturday, June 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसुषमा अंधारेंच्या हेलिकॉप्टरचे क्रॅश लँड

सुषमा अंधारेंच्या हेलिकॉप्टरचे क्रॅश लँड

मुंबई | Mumbai
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना आणण्यासाठी गेलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची घटना महाडमध्ये घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही काहीही इजा झालेली नाही. सुषमा अंधारे आणि हेलिकॉप्टरचा पायलेट दोघेही सुरक्षित आहेत. हे हेलिकॉप्टर नेमके कशामुळे क्रॅश झाले याची माहिती समोर आलेली नाही.

- Advertisement -

सुषमा अंधारे यांची काल कोकणात सभा होती. त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले होते. परंतु ते हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सुदैवाने सुषमा अंधारे हेलिकॉप्टर मध्ये बसलेल्या नव्हत्या, त्या बसायच्या आधीच हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातामध्ये पायलेट सुखरुप आहे.

नक्की काय घडलं
गेल्या २ दिवसांपासून सुषमा अंधारे ठाकरे गटाचे रायगडमधील उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गितेंच्या प्रचारासाठी रायगड दौऱ्यावर आहेत. आज आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरने मुरुडला जाणार होत्या. त्यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर महाडमधील एका मैदानात उतरत असताना त्याचा अपघात झाला. जमीनीपासून काही फुटांवर असतानाच हेलिकॉप्टरवरील पायलटचे नियंत्रण सुटले आणि ते खाली पडले.

अंधारे काय म्हणाल्या
मला प्रचारसभेला जायचे होते. कोकणता दोन ते तीन सभा आणि मंडणगड तसेच रोहा या ठिकाणी जायचे होते. त्याआधीच ही घटना घडली आहे. महाडची सभा करुन मुक्कामाला थांबले होते. हेलिपॅडजवळ आम्ही होतो. चॉपर येणार होते. चॉपरने ते दोन ते तीन घिरट्या घातल्या आणि अचानक मोठा आवाज झाला. तसेच धुळीचे लोट उठले. सुरुवातीला नीट काही समजलं नाही. पण आजूबाजूचे सगळे लोक सांगत होते की पुढे जाऊ नका. मला कॅप्टनची चिंता होती की ते सुखरुप आहेत की नाही? मात्र कॅप्टन सुखरुप आहेत. मी आणि माझा लहान भाऊ आम्ही दोघे प्रवास करणार होतो पण आम्ही सगळे सुखरुप आहोत. प्रवास सुरु करण्याआधीच ही घटना घडली. असे सुषमा अंधारेंनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या