Saturday, April 26, 2025
Homeक्राईमकुस्तीपटूच्या खून प्रकरणातील संशयितास अटक

कुस्तीपटूच्या खून प्रकरणातील संशयितास अटक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मुंबई महामार्गावरील राजूर फाटा परिसरात कुस्तीपटू भुषण दिनकर लहामगे (४०, रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) यांची शुक्रवारी (दि.१०) मारेकऱ्यांनी धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. त्यानंतर आता या कुस्तीपटूच्या संशयित काकाला वाडीवऱ्हे पाेलीसांनी अटक केली आहे. तसेच मृत कुस्तीपटूच्या चुलतभाऊ व इतरांचा शाेध सुरु आहे. याबाबत मृताच्या पत्नीने संशयित चुलत सासरा आणि दिरांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

- Advertisement -

वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून यशवंत पुंजाजी लहामगे असे अटक केलेल्या संशयित काकाचे नाव आहे. मृत भुषण लहामगे हे शुक्रवारी दुपारी दुचाकीवरून पाथर्डी फाटा ते सांजेगाव असे जात होते. त्यावेळी कारमधून आलेल्या मारेकऱ्यांनी भुषणच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर भुषण यांनी दुचाकी सोडून पळ काढला असता भूषणचा चुलतभाऊ वैभव आणि इतरांनी कोयता, चॉपरने वार करून निर्घृण हत्या केली. हल्ला करून मारेकरी पसार झाले.

याप्रकरणी अदिती भूषण लहामगे यांनी वाडिवऱ्हे पोलिस ठाण्यात भुषणचा चुलत भाऊ वैभव यशवंत लहामगे, त्याचे वडिल यशवंत लहामगे व आई सुमनबाई यशवंत लहामगे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तास करीत यशवंत यांना अटक केली आहे. जमीनीचा व आर्थिक कारणावरून संशयितांनी भुषण लहामगे यांची हत्या केल्याचे समोर येत आहे.

या कारणातून हत्या
अदिती यांच्या फिर्यादीनुसार, सांजेगाव येथील शिवाचे ओहोळ येथे लहामगे कुटूंबियांची सामाईक शेती असून त्याच्या वाटणीवरून चुलतभाऊ भुषण यांच्यासोबत वैभव आणि यशवंत लहामगे यांचे वाद सुरु होते. त्यातून वैभवसह त्याच्या आईवडिलांनी भुषण यांना व कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे भुषण ही दहशतीत वावरत होते. यशवंत व सुमनबाई यांनी चिथावणी दिल्यामुळे वैभवने इमारत मारेकऱ्यांसोबत मिळून भुषण यांच्यावर हल्ला करुन हत्या केल्याचे अदिती यांनी म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...