Wednesday, June 26, 2024
Homeक्राईमNashik Crime News : पहिलवानाच्या खून प्रकरणातील संशयित अटकेत

Nashik Crime News : पहिलवानाच्या खून प्रकरणातील संशयित अटकेत

ठाणे ग्रामीण पोलीसांची कारवाई; पाच कोटींच्या सोने चोरीतही सहभाग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे येथील सांजेगावातील उत्तर महाराष्ट्र केसरी पहिलवान भूषण लहामगे (Bhushan Lahamage) खून प्रकरणतील संशयित त्याचा चुलत भाऊ वैभव लहामगे याला ठाणे ग्रामीण पोलिसांनी (Thane Rural Police) अटक (Arrested) केली आहे. वैभव याने भूषणची हत्या करण्यापूर्वी नाशिकच्या जुना गंगापूर नाक्यावरील आयसीआयसीआय होम फायनान्स बँकेत पाच कोटींच्या दागिने चोरल्याचे समोर आले. त्यामुळे एकाचवेळी दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पाच काेटींच्या साेने चाेरीचा पर्दाफाश; तिघांचा शाेध सुरु

याबाबत अधिक माहिती अशी की, १० मे रोजी दुपारी साडेचार वाजता नाशिक-मुंबई महामार्गावरील (Nashik-Mumbai Highway) राजूर फाटा येथे भूषण लहामगे (वय ४५) या पहिलावानाची हत्या (Murder)झाली. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ संशयित वैभव यशवंत लहामगे, काका यशवंत लहामगे व काकू सुमनबाई लहामगे यांच्याविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद आहे. जमिनीसह आर्थिक वादातून भूषण याने ही हत्या केल्याचे तपासात समोर येत आहे. हत्येनंतर यशवंत यांना नाशिक पोलिसांनी अटक केली. तर पसार झालेल्या वैभवला ठाणे पोलिसांनी (Thane Police) बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, भूषण याचा वैभवसोबत आर्थिक वाद होता का? याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘ओएलएक्स’वर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक

दारोडे, खूनाचे गुन्हे

सन २०१६ मध्ये ठाणे येथील चेकमेट सर्व्हिसेस या कंपनीत दरोडा टाकून १ कोटी ४० लाखांची रक्कम जव्हारमध्ये लपविण्यात आली होती. याप्रकरणात नाशिक व ठाणे पोलिसांनी ११ संशयितांना अटक केली होती. त्यामध्ये संशयित वैभव लहामगे हादेखील होता. यासह सन २०२३ मध्ये नाशिक पोलिसांनी सोलापूर एमडी कारखाना प्रकरणात अमोल वाघ याला अटक केली होती. अमोल हा वैभवसोबत ठाण्याच्या दरोड्यात सहभागी होता. त्यावेळी कारागृहात त्याने इतर संशयितांशी ओळख करुन एमडी ड्रग्जती माहिती घेतली होती.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सेवानिवृत्तास गुंतवणुक करण्यास भाग पाडून १७ लाख रुपये उकळले

- Advertisment -

ताज्या बातम्या