Wednesday, March 26, 2025
Homeनगरपतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण

पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण

पत्नीसह सहा जणांवर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

पतीच्या चारित्र्यावर संशय घेवून पत्नी व तीच्या नातेवाईकांनी पती अमोल गोरे या तरुणाला लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) केल्याची घटना राहुरीतील (Rahuri) येवले आखाडा येथे घडली आहे. अमोल गोरक्षनाथ गोरे (वय 26 वर्षे, रा. येवले आखाडा, ता. राहुरी, हल्ली रा. आढळगांव ता. श्रीगोंदा) या तरुणाने राहुरी पोलिस ठाण्यात (Rahuri Police Station) दिलेल्या फिर्यादीत म्हटले कि, अमोल गोरे याची पत्नी निर्मला ही अमोल गोरे याच्या चारित्र्यावर संशय घेवून नेहमी वाद (Dispute) घालते व माहेरी निघुन जाते.

- Advertisement -

एका महिले सोबत अनैतिक संबंध (Immoral Relationship) आहे. या संशयावरुन निर्मला ही सुमारे तीन महिन्यांपुर्वी तिचे माहेरी उक्कलगाव ता. श्रीरामपुर येथे निघुन गेली आहे. दि. 13 मे 2024 रोजी दुपारी 5 वाजे दरम्यान अमोल गोरे हा घरासमोर चहा पित असताना तेथे त्याची पत्नी व इतर आरोपी आले. तेव्हा अमोल याची पत्नी म्हणाली की, माझ्या मुलांची तु काय सोय करणार आहेस? असे म्हणुन तिने व इतर आरोपींनी अमोल गोरे याच्यासह एका महिलेला शिवीगाळ करुन लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) केली.

अमोल गोरक्षनाथ गोरे याच्या फिर्यादीवरून आरोपी निर्मला अमोल गोरे, राकेश शरद रजपुत, महेश शरद रजपुत, प्रदिप पवार, दिपक पवार, नितिन भागवत पवार, सर्व रा. उक्कलगांव, ता. श्रीरामपुर. यांच्यावर गु र.नं. 575/2024 भादंवि कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Police: पोलीस आयुक्तालयातील अंमलदार ‘एआय’ स्नेही होणार

0
नाशिक | प्रतिनिधीपोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस अंमलदार आता आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात 'एआय' चा वापर करण्यास सक्षम होणार आहे. कारण, या अंमलदारांना एआयच्या विविध अॅपची...