Tuesday, September 17, 2024
Homeनाशिकअल्पबचत प्रतिनिधीवर हल्ला करून लुटणाऱ्या संशयित आरोपींना अटक

अल्पबचत प्रतिनिधीवर हल्ला करून लुटणाऱ्या संशयित आरोपींना अटक

क्राईम ब्रँच युनिट दोन ची उल्लेखनीय कामगिरी

नाशिक रोड | प्रतिनिधी Nashikroad

- Advertisement -

बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास जेल रोड परिसरातील कोठारी कन्या शाळेजवळ नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी जितेंद्र लोहारकर हे नाशिक रोड जेल रोड परिसरातील व्यापाऱ्यांचे जमा झालेले कलेक्शन गोळा करून घरी जात असताना त्यांना चौघा जणांनी अडवून त्यांच्याकडील सुमारे एक लाख पाच हजार रुपयाची रोकड लंपास केली होती तसेच त्यांच्यावर सशस्त्र हल्ला करून त्यांना जखमी केले होते या घटनेनंतर संशयित आरोपी हे पळून गेले होते.या प्रकरणी क्राइम ब्रांच युनिट दोन ने उल्लेखनीय कामगिरी करून चौघा आरोपींना तातडीने अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान या घटनेमुळे नाशिक रोड परिसरात खळबळ उडाली होती त्याचप्रमाणे या घटने प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता सदर घटनेची दखल क्राईम ब्रँच युनिट दोन ने घेतल्यानंतर याबाबतची गुप्त माहिती क्राईम ब्रँच युनिट दोन चे हवालदार प्रकाश भालेराव यांनी गुप्त माहिती घेऊन याबाबत माहिती घेतली असता संशयित आरोपी हे सिन्नर फाटा परिसरातील एका हॉटेल जवळ असल्याचे समजले त्यानंतर त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमन वार यांना दिली.

त्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांसह सापळा रचून सिन्नर फाटा येथील हॉटेल जवळ येऊन संशयित आरोपी यांना मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेतले असता यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांचे नावे विश्वास नितीन श्री सुंदर वय 25 राहणार जलशुद्धीकरण केंद्र नवीन कोर्ट नाशिक रोड हारून निसार कुरेशी वय 26 राहणार लक्ष्मी अपार्टमेंट समोर दशक जेलरोड नाशिक रोड भारत देविदास चौधरी राहणार एकलहरा रोड मोगल मंजिल जवळ मगर मळा नाशिक रोड व नासिर कमृद्दिन शेख वय 22 राहणार गुलशन नगर डेपोजवळ मालेगाव असे असल्याचे चौकशी निष्पन्न झाले त्यांना ताब्यात घेतले असता व विचारपूस केल्यानंतर त्यांनी त्यांचा साथीदार हर्षद त्रिभुवन उर्फ कछि राहणार जलशुद्धीकरण केंद्र नाशिक रोड असे असल्याचे त्यांनी सांगितले या संदर्भात त्यांनी गुन्हा कबूल केल्याचे सांगितले त्यांच्याकडून दोन कोयते दोन मोपेड स्कूटर तीन मोबाईल व लुटून नेलेली रक्कम असा सुमारे एक लाख 82 हजार रुपये चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी क्राईम ब्रँच युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमन वार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे पोलीस हवालदार प्रकाश भालेराव पोलीस हवालदार शंकर काळे पोलीस हवालदार सुनील आहेर पोलीस हवालदार सोमनाथ जाधव प्रकाश महाजन प्रकाश बोडके चव्हाण प्रवीण वानखेडे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या