Friday, May 3, 2024
Homeनगरस्वच्छ भारत अभियानासाठी नगरकर सज्ज

स्वच्छ भारत अभियानासाठी नगरकर सज्ज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वच्छ भारत अभियाना निमित्त नगर शहर हे फाईव्ह स्टार मानांकन मिळविण्यासाठी सज्ज झाले असून मनपाच्या वतीने विविध ठिकाणी भिंती रंगवून स्वच्छतेचे संदेश देण्याचे काम केले आहे.

- Advertisement -

या माध्यमातून नागरिकांनामध्ये जनजागृती होण्यास मदत होईल. मनपाचे घनकचरा विभागातील कर्मचारी ठिकठिकाणी स्वच्छता मोहिम राबवित आहे. याचबरोबर नगरकरही या स्वच्छता मोहिमेमध्ये मोठया संख्येने उतरले असून रांगोळी काढून स्वच्छतेचे महत्व पटवून सांगत आहे.

या माध्यमातून शहरातील नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होणार आहे. यासाठी सर्व नगरकरांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये भाग घेवून सहकार्य करावे असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त शंकर गोरे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या