Wednesday, March 26, 2025
Homeमनोरंजन‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात, जोडप्याचा मृत्यू

‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात, जोडप्याचा मृत्यू

दिल्ली | Delhi

बॉलिवूड किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘स्वदेस’ या सिनेमातून मनोरंजन क्षेत्रातमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशी हिचा इटलीमध्ये गंभीर कार अपघात झाला आहे.

- Advertisement -

या घटनेवेळी गायत्री जोशी आणि पती विकास ओबेरॉयसोबत तिच्या लॅम्बोर्गिनी कारमधून प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या अपघातातून दोघेही थोडक्यात बचावले आहेत. परंतु त्यांच्याशी धडकलेल्या फरारी या कारमधून प्रवास करणाऱ्या एका जोडप्याचा मात्र जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Accident News : भीषण अपघात! पर्यटकांना घेऊन जाणारी बस उलटली; २१ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कारवाई सुरू केली. असं सांगितलं जात आहे, की अभिनेत्री आणि तिचा पती आलिशान कारसोबत रेस करत होते. रिपोर्ट्सनुसार, इटलीच्या सार्डिनिया भागात हा अपघात झाला. घटनेच्या वेळी गायत्री आणि तिचा पती लॅम्बोर्गिनीमध्ये प्रवास करत होते. त्यांच्या कारच्या मागे-पुढे इतरही अनेक लग्झरी गाड्या होत्या. यावेळी पुढे जात असलेल्या मिनी ट्रकला ओव्हरटेक करत असताना त्यांची कार Ferrari वर आदळली आणि ती Ferrari बाजूने जाणाऱ्या मिनी ट्रकला धडकली. या धडकेमुळे मिनी ट्रक उलटला आणि Ferrari ला आग लागली, यात त्यात प्रवास करणाऱ्या जोडप्याचा मृत्यू झाला.

‘समृद्धी’ महामार्गाच्या टोल नाक्यावरील परप्रांतीय मॅनेजरला मनसैनिकांकडून चोप

अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला आहे, जो मागून येणाऱ्या वाहनाच्या डॅशबोर्डवर बसवलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या वाहनाला एकामागून एक किती लग्झरी वाहनं ओव्हरटेक करतात हे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर थोडं पुढे जात असताना एका मिनी ट्रकला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला, त्यामुळे कार आणि ट्रक दोन्ही पलटी झाले.

ऐकावं ते नवलच! मुंबईतील स्विमिंग पूलमध्ये चक्क मगर.. प्रचंड घबराट आणि पळापळ

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्याप्रकरणात नेमके काय घडलं? उज्ज्वल निकमांनी...

0
बीड | Beedबीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सुनावणीला २० मार्च रोजी सुरुवात झाली असून आज या प्रकरणातील दुसरी सुनावणी कोर्टात पार...