Thursday, September 19, 2024
Homeक्रीडाParis Olympics 2024 : महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेने रचला इतिहास; नेमबाजीत भारताला मिळवून...

Paris Olympics 2024 : महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेने रचला इतिहास; नेमबाजीत भारताला मिळवून दिले ‘हे’ पदक

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) स्पर्धेत भारताला आज तिसरे पदक मिळाले आहे. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळेने (Swapnil Kusale) ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण ४५१. ४ गुण प्राप्त केले. तर चीनच्या लिऊ युकुनने ४६३.६ गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले आहे.

हे देखील वाचा : टपटप…टपटप…! नव्या संसदेच्या छताला गळती; विरोधी पक्षांकडून Video पोस्ट

स्वप्नील कुसळे हा खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत. तर स्वप्नीलपूर्वी मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याचवेळी सरबज्योतसह मनूने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले.

स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर (Kolhapur) येथील कांबळवाडी गावातील असून तो २०१२ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता १२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आहे.तसेच स्वप्नीलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास देखील खूपच रंजक आहे.

हे देखील वाचा : Cloudburst News : उत्तराखंड-हिमाचलमध्ये पावसाचे रौद्ररुप; ढगफुटीमुळे ११ जणांचा मृत्यू, ४४ बेपत्ता

दरम्यान, स्वप्नीलने अभिनव बिंद्राला २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी १२ वीच्या परिक्षेकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर २००९ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.यानंतर सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या