Friday, December 13, 2024
Homeदेश विदेशटपटप...टपटप...! नव्या संसदेच्या छताला गळती; विरोधी पक्षांकडून Video पोस्ट

टपटप…टपटप…! नव्या संसदेच्या छताला गळती; विरोधी पक्षांकडून Video पोस्ट

स्थगिती प्रस्ताव मांडला जाणार

नवी दिल्ली | New Delhi

काही महिन्यांपूर्वी राम मंदिराच्या छताला गळती लागल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता नव्या संसदेतील (New Parliament) एक व्हिडीओ काँग्रेसचे खासदार मनिकम टागोर (Congress MP Manickam Tagore) यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये संसदेच्या नव्या इमारतीमध्ये चक्क पाणीगळती होत असल्याचे दिसत आहे.त्यासाठी खाली बादली ठेवून ते पाणी जमा केले जात असल्याचे दृश्य दिसत आहे. यासंदर्भात विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला असून त्यासाठी संसदेत स्थगिती प्रस्ताव मांडला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशिक, नगरमध्ये होणार नवीन एमआयडीसी; तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे अजित पवारांचे निर्देश

काँग्रेससह विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांनी संसदेतील पाणीगळतीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाच्या (Congress MP) अधिकृत एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करून फक्त ‘नई संसद’ अशा दोन शब्दांत पोस्ट केली आहे. तर काँग्रेस खासदार मनिकम टागोर यांनी पाणीगळतीचा व्हिडीओ शेअर करून संसदेत स्थगन प्रस्ताव सादर केला आहे. त्याशिवाय, या व्हिडीओसह त्यांनी खोचक शब्दांत पोस्टही केली आहे.

तर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीही खोचक पोस्ट शेअर केली आहे.त्यामध्ये त्यांनी म्हटले की, “नव्या संसदेपेक्षा जुनीच संसद खूप चांगली होती. तिथे जुने खासदार देखील येऊन भेटू शकत होते. जोपर्यंत अब्जावधी खर्चून बांधलेल्या संसदेतून पाणी टपकण्याचा कार्यक्रम पूर्ण होत नाही तोवर आपण का नाही जुन्या संसदेत जाऊया, असा उपरोधिक टोला अखिलेश यांनी लगावला आहे. तसेच भाजपा सरकारने बनविलेल्या प्रत्येक नव्या छताला गळती लागणे हे मुद्दामहून विचार करून केलेल्या डिझाईनचा भाग तर नाहीय ना? असे जनता विचारत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : UPSC चा मोठा निर्णय! पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द, भविष्यात परीक्षा देण्यासही मनाई

दरम्यान,”काँग्रेसचे खासदार मनिकम टागोर यांनी नव्या संसद भवनातील गळतीवर उपाय शोधण्यासाठी समितीची स्थापना करण्याची मागणी केली आहे. तसेच ही समिती या पाणीगळतीच्या कारणांचा शोध घेईल, नव्या इमारतीच्या डिझाईनचा आणि त्यासाठी वापरलेल्या बांधकाम साहित्याचा आढावा घेईल आणि आवश्यक त्या उपाययोजना सुचवेल. त्याचबरोबर ही समिती नव्या इमारतीच्या देखभालीसंदर्भात निश्चित अशी नियमावली निश्चित करेल. या सर्व प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी आपल्या अभ्यासाचे निष्कर्ष ही समिती जाहीर देखील करेल”, असे त्यांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या