मुंबई | Mumbai
भारत आणि श्रीलंका (India vs Srilanka) यांच्यात आज (दि.२७) जूलैपासून तीन टी २० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे (Team India) कर्णधारपद सुर्यकुमार यादव तर श्रीलंकेचे कर्णधारपद चरीत असलंकाकडे असणार आहे. नुकत्याच पार पडून गेलेल्या झिंबाब्वे विरूध्दच्या मालिकेत भारतीय संघाने शुभमन गिलच्या (Shubhman Gill) नेतृत्वाखाली मालिका विजय संपादन केला होता.तर सूर्यकुमार यादवची कर्णधार म्हणून तिसरी मालिका असणार आहे.
भारतामध्ये ऑस्ट्रेलियाविरूध्द मालिकेत भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) ४-१ ने मालिका विजय संपादन केला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेविरूध्द दक्षिण अफ्रिकेत २०२३ मध्ये ३ सामन्यांची टी २० मालिका दोन्ही संघांनी १-१ विजय संपादन केला होता.जून महिन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी २० वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर भारतीय संघातून रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी निवृत्ती जाहीर केली होती. शिवाय भारतीय संघाचे तत्कालीन प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला होता.
यानंतर आता भारतीय संघाचे नवीन प्रशिक्षक गौतम गंभीरची ही पहिलीच परिक्षा असणार आहे. रोहित शर्मा,रवींद्र जडेजा,विराट कोहली यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच प्रशिक्षक गौतम गंभीरची काय नवीन रणनीती असणार आहे. भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी कुणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.दुसरीकडे चरीत असलंकाची कर्णधार म्हणून पहिलीच मालिका असणार आहे.टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी मागे सारून नव्याने सुरुवात करण्यासाठी श्रीलंका मैदानावर उतरणार आहे.
मात्र, या मालिकेपूर्वी श्रीलंकासंघाची अडचण वाढली आहे. दुश्मनंता चमिरा आणि नुवान तुषारा दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत.२०२१ मध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा दौरा केला होता.तर दसून शनाकाच्या नेतृत्वात श्रीलंकेने भारतावर मालिका विजय संपादन केला होता.त्यानंतर भारत विरूध्द श्रीलंका संघामध्ये २९ टी २० सामने खेळविण्यात आले आहेत.भारतीय संघाने १९ तर श्रीलंका ९ सामन्यात विजयी झाला आहे.तर १ सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा