Thursday, March 27, 2025
Homeक्राईमताहाराबाद येथे भिंत पाडून घरफोडी

ताहाराबाद येथे भिंत पाडून घरफोडी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

रात्रीच्या वेळी बंद असलेल्या घराची भिंत पाडून आरोपींनी घरातील सोन्याने दागीने व घरातील गृहपयोगी वस्तू चोरुन नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे दि. 25 जून रोजी घडली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अर्चना किरण गायकवाड (वय 21) रा. निंबळक ता. अहमदनगर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अर्चना गायकवाड यांच्या आई वडिलांचे राहुरी तालूक्यातील ताहराबाद येथील पाण्याच्या टाकीजवळ घर आहे.

- Advertisement -

आई-वडील मयत झाल्यापासून अर्चना गायकवाड व त्यांच्या बहिणी अधून मधून वडिलांच्या घरी येऊन राहतात. सदर घरामध्ये संसार उपयोगी भांडे आणि आईचे जुने वापरलेले दागिने ठेवलेले होते. 25 जून 2024 रोजी रात्री 8 वाजे दरम्यान आरोपींनी घराची भिंत मशिनने पाडली व घरातील सोन्याने दागीने व घरातील गृहपयोगी वस्तू चोरुन नेल्या. घटनेनंतर अर्चना किरण गायकवाड यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून प्रदीप गंगा विधाते, महेश गंगा विधाते, अनिल उत्तम विधाते, शिवाजी उत्तम विधाते सर्व रा. ताहराबाद ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. 758/2024 भादंवि कलम 380, 457, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : बंगाली कारागीराने नऊ लाखांचे सोने पळविले

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar येथील सराफ व्यावसायिकाने सोने कारागीराकडे दागिने तयार करण्यासाठी दिलेले 90 ग्रॅम 50 मिलीग्रॅम सोने आणि दुरूस्तीसाठी दिलेली 35 ग्रॅम 780 मिलीग्रॅम वजनाची...