Friday, May 3, 2024
Homeनगरटाकळीभान सरपंच-उपसरपंच यांच्यातील वाद मिटला

टाकळीभान सरपंच-उपसरपंच यांच्यातील वाद मिटला

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

गेल्या काही दिवसांपासून टाकळीभान ग्रामपंचायतीचे सरपंच-उपसरपंच बदलाचे वारे वाहत होते. मात्र नुकताच सरपंच अर्चना रणनवरे व उपसरपंच कान्हा खंडागळे गटाने गावाच्या विकासाच्या मुद्यावर जुळून घेतल्याने सरपंच, उपसरपंच बदलावर पडदा पडला आहे. मुरकुटे गटाच्या स्थानिक नेत्यांच्या जाचाला कंटाळून विकासासाठी उपसरपंच गटाचे समर्थन घेतल्याचे ग्रामसचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच अर्चना रणनवरे यांनी घोषणा केली.

- Advertisement -

सरपंच अर्चना रणनवरे यांनी मुरकुटे गटाच्या स्थानिक नेत्यांचा दबाव झुगारुन भाजपाचे उपसरपंच कान्हा खंडागळे गटाचे ग्रामपंचायत कामकाजात समर्थन घेण्याचा निर्णय घेतल्याने काल दि. 22 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सरपंच अर्चना रणनवरे म्हणाल्या, मी आजही मुरकुटे गटातच आहे. गेले काही दिवस आमच्या गटाच्या स्थानिक नेत्यांनी ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप केल्याने दोन गट झाले होते. त्यामुळे गेल्या दिड वर्षात कोणतेही विकासाचे काम करता आले नाही. मला विचारात न घेता व कोणतीही माहिती न नेताच वरिष्ठांकडे माझ्या सरपंच पदाच्या राजीनाम्याची मागणी केली गेली होती. वास्तविक याच नेत्यांनी विकासकामात नेहमीच आडकाठी घातली होती. ग्रामस्थांना गावाच्या विकासाच्या दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी अखेर दबाव झुगारुन उपसरपंच गटाच्या विकास कामासाठी पाठिंबा घेतला असून येणार्‍या काळात भरीव निधीसाठी प्रयत्न करुन विकासाचा राहिलेला अनुषेश भरुन काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे म्हणाले, नागरिकांना रामराज्याचे स्वप्न दिल्याने मतदारांनी 16-1 च्या फरकाने सदस्य निवडून दिले होते. मात्र विकासाची दृष्टी नसलेल्या आमच्या स्थानिक नेत्यांनी सदस्य मंडळातच दुफळी पाडल्याने गेल्या दोन वर्षात विकास होऊ न शकल्याने मायबाप मतदारांची माफी मागतो. मात्र आता मुरकुटे गटाचे सरपंच अर्चना रणनवरे, सदस्य सुनिल बोडखे व लता भाऊसाहेब पटारे यांनी स्थानिक नेत्यांना न जुमानता विकासासाठी देवू केलेले समर्थन घेतल्याने आता विकासकामे वेगाने केली जाणार आहेत. नऊ सदस्यांच्या बहुमतात विकास कामे मार्गी लावण्यासाठी व मतदारांना दिलेले रामराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यापुढील कार्यकाळात प्रयत्न केले जातील. पूर्ण कालावधीसाठी म्हणजे 2016 च्या निवडणुकीपर्यंत अर्चना रणनवरे यांना समर्थन असणार असल्याचेही खंडागळे यांनी सांगितले.

यावेळी प्राचार्य जयकर मगर, नारायण काळे, भाऊसाहेब पटारे, बापूसाहेब शिंदे यांनीही चर्चेत भाग घेत विकासाचे समर्थन केले. याप्रसंगी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष राहुल पटारे, भाऊसाहेब पवार, रावसाहेब मगर, आबासाहेब रणनवरे, सुधिर मगर, राहुल कोकणे, भागवत रणनवरे, पोपट जाधव, रमेश पटारे, दिगंबर मगर, सुभाष येवले, संतोष पटारे, बाबासाहेब गायकवाड आदींसह सरपंच-उपसरपंच समर्थक उपस्थित होते.

दरम्यान, ग्रामपंचायत कामकाजात सरपंच अर्चना रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, सदस्य सुनिल बोडखे, दिपक पवार, अशोक कचे, दिपाली खंडागळे, कल्पना मगर, लता भाऊसाहेब पटारे, कालिंदा गायकवाड हे नऊ सदस्य विकास कामासाठी एकदिलाने काम करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

गेम चेंजर अ‍ॅड. कोकणे

आठ-दहा दिवसांपासून सरपंच-उपसरपंच बदलाच्या वेगवान हालचाली सुरु झाल्या होत्या. अ‍ॅड. दिपक कोकणे यांनी सर्व घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून सरपंच पती यशवंत रणनवरे, सदस्य सुनिल बोडखे व उपसरपंच कान्हा खंडागळे यांच्यात दिलजमाई घडवून आणण्याची मोलाची भूमिका बजावली व रुतलेला विकासाचा रथ पुन्हा सुरु करण्यात गेम चेंजर म्हणून मोलाची भूमिका पार पाडली.

ग्रामपंचायतीत विरोधी उपसरपंच गटाचे कामकाजासाठी समर्थन घेतले असले तरी आम्ही मुरकुटे गटाचेच आहोत. आतापासून आमचा मुरकुटेंचा दुसरा गट म्हणून कामकाज करणार आहे. याबाबत माजी आ. मुरकुटे यांच्यांशी सविस्तर चर्चा झालेली आहे.

– यशवंत रणनवरे, संचालक, अशोक कारखाना.

- Advertisment -

ताज्या बातम्या