Tuesday, May 21, 2024
Homeनंदुरबारऑक्सिजन बेड्स वाढविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करा

ऑक्सिजन बेड्स वाढविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करा

नंदुरबार ! प्रतिनिधी Nandurbar

शहादा, तळोदा आणि नवापूर येथे ऑक्सिजन बेड्स वाढविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी आणि धडगाव येथे 30 बेड्सचे सीसीसी तयार करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले

- Advertisement -

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, कोविड बाधितांना बेड्सच्या उपलब्धतेची माहिती देण्यासाठी तालुका नियंत्रण कक्ष सुरू करावे. शहादा येथे 100 आणि नवापूर आणि तळोदा येथे किमान 50 बेड्सच्या ऑक्सिजन बेड्सची सुविधा करावी.

खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन बेड्सची सुविधा निर्माण करण्यासाठी आवाहन करण्यात यावे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा कोविड सेंटरसाठी घ्यावी. तालुका स्तरावर व्हेंटीलेटरची सुविधा सुरू करण्यात यावी, त्यासाठी डॉक्टरांचे प्रशिक्षण करावे.

धडगाव येथे 30 आणि शहादा येथे 100 बेड्सचे सीसीसी तयार ठेवावे. नवापूर आणि तळोदा येथे कोविड केअर सेंटर सुविधा सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी. अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करावे.

शहादा येथेही लवकरच ऑक्सिजन प्लँटची सुविधा होणार आहे. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांची एनआरएचएममधून तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी. ऑक्सिजन बेड आवश्यक नसलेल्या कोरोना बाधितांना गृह अलगीकरणात किंवा कोविड केअर सेंटरला स्थलांतरीत करावे व गरजूंना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्यावा.

नव्याने वाढणाऱ्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी टीम वर्क म्हणून आवश्यक नियोजन करावे.

खाजगी रुग्णालयासाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करावी आणि असे रुग्णालय कोविड हॉस्पिटल सुरू qकरणार असल्यास त्वरीत मान्यता देण्याची कार्यवाही करावी. एका आठवड्यात आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी.

जिल्ह्यात एका आठवड्यात आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. प्रतिबंधीत क्षेत्रातील बाधित व्यक्तींच्या नातेवाईकांची कोरोना चाचणी तात्काळ करण्यात यावी. ग्रामीण भागात अधिक संसर्ग आढळल्यास पूर्ण गावात मोहिम स्तरावर कोरोना चाचण्या करण्यात याव्यात. रॅपिड अँटीजन चाचणीत कोरोना बाधित आढळणाऱ्यांना स्थानिक स्तरावर औषधे उपलब्ध करून देण्यात यावी.

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आणि शहरी भागात वॉर्डनिहाय कोरोना लसीकरणासाठी नियोजन करावे. गावात लसीकरणासाठी स्थळ निश्चित करावे.

कग्रामस्थांना एक आठवड्यापूर्वी सूचना द्यावी आणि शिबिराच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावे. कोरोना उपचारांसोबत लसीकरण मोहिमही वेगाने राबवावी. जिल्ह्यासाठी कोरोना लसीचे आणखी 29 हजार डोस प्राप्त होत आहेत. 30 दिवसाच्या लसीकरण मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करावे आणि लसीकरण शिबिराची माहिती नागरिकांना द्यावी.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून पुढील 15 दिवस महत्वाचे आहेत. पोलिसांनी जिल्ह्यातील सीमांवर बारकाईने लक्ष द्यावे. कोरोना संपर्क साखळी तोडण्यासाठी संचारबंदी आवश्यक असल्याचे नागरिकांना समजावून सांगावे. मोठे सोहळे टाळण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीस महसूल, पोलीस, आरोग्य, जि.प., नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या