Thursday, January 8, 2026
HomeनगरBribery Case: तलाठ्यासाठी स्विकारली २० हजारांची लाच, खासगी एजंटला रंगेहाथ पकडले

Bribery Case: तलाठ्यासाठी स्विकारली २० हजारांची लाच, खासगी एजंटला रंगेहाथ पकडले

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी वीस हजारांची लाचेची मागणी कोपरगाव तालुक्यातील धारणगावच्या तलाठ्याने केली. वीस हजार रुपयांची लाच घेताना खाजगी एजंटला लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कोळपेवाडी येथील वाळू व्यावसायीकाला धारणगाव येथील गोदावरी नदी पात्रातून बेकायदेशीर वाळूची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करण्यासाठी तलाठी धनंजय गुलाब पहऱ्हाड याने वीस हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर वाळू व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली.

YouTube video player

तेव्हा तलाठी पहाड याने स्वतः साठी १० हजार व मंडळ अधिकारी पोकळे यांच्यासाठी १० हजार अशी एकूण वीस हजार रुपयांची मागणी केली. ६ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता सापळा रचण्यात आला. कोपरगाव शहरातील बसस्टँड जवळ तलाठी पहाड यांच्या सांगण्यावरून सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी रा. धारणगाव याने लाच स्विकारली. पंचासमक्ष लाच स्विकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.

आपला एजंट पकडल्या गेला असल्याची माहिती मिळताच, तलाठी धनंजय पहऱ्हाड पसार झाला आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात शुक्रवार दि. ७ मार्च रोजी सकाळी सहा वाजता फिर्याद दाखल झाली आहे. या फिर्यादीवरून तलाठी धनंजय पऱ्हाड व सागर चौधरी याच्या विरूद्ध भष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाचे कलम ७, ७ (अ), १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक छाया देवरे या करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘मुख्यमंत्री पंचायत राज’मध्ये 61 रूपये कोटींची वसुली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सध्या राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी दिलेली सवलत चांगलीच लागू पडली असून दीडच महिन्यात तब्बल 61...