Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमतीन हजाराची लाच भोवली ; तलाठी एसीबीच्या जाळ्यात

तीन हजाराची लाच भोवली ; तलाठी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव – jalgaon
तालुक्यातील कुसूंबा येथे सातबारा उतार्‍यावर आई व भावाचे नाव लावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच तलाठ्याने मागितली होती. तडजोडीअंती तलाठ्याला तीन हजार रुपये लाच घेताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठ्यास रंगेहाथ अटक केली आहे.

तक्रारदार यांनी त्यांचे आई व भावाचे नाव सातबारा उतार्‍यावर व स्लॅब रजिस्टरवर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबत तलाठी नितीन शेषराव भोई (वय 31 वर्षे) यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि.7 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांना तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता तलाठी नितीन भोई यांनी सातबारा उतार्‍यावर व स्लॅब रजिस्टरवर नाव लावण्यासाठी प्रथम 5 हजार, नंतर 4 हजार रुपये व तडजोडअंती 3 हजार रुपयाची लाचेची मागणी केली.

- Advertisement -

यावेळी तलाठी नितीन भोई दि.7 जानेवारी रोजी 3 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, फौजदार सुरेश पाटील, पोना बाळू मराठे, पोकॉ अमोल सूर्यवंशी यांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...