Wednesday, June 10, 2026
Homeदेश विदेशTaliban Attack Pakistan: तालिबानचा पाकिस्तानवर मोठा एअर स्ट्राईक, नूर खान एअर बेससह...

Taliban Attack Pakistan: तालिबानचा पाकिस्तानवर मोठा एअर स्ट्राईक, नूर खान एअर बेससह तळांवर हल्ले

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
एकीकडे अमेरिका, इराण, इस्लायल देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला असून दुसरीकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या युद्धाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. तालिबानने अनेक पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, त्यांच्या हवाई दलाने रावळपिंडीतील पाकिस्तानी हवाई दलाच्या महत्त्वाच्या नूर खान हवाई तळासह अनेक पाकिस्तानी लष्करी तळांवर हवाई हल्ले केले.

तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की त्यांनी रावळपिंडीच्या नूर खान एअर बेसवर, बलुचिस्तानच्या क्वेटा येथील १२ व्या डिविजनच्या मुख्यालयावर आणि खैबर पख्तुनवा येथील मोहम्मद एजन्सीच्या ख्वाजाई कँप सह मुख्य लष्करी तळांना लक्ष्य केले आहे.

- Advertisement -

पाकिस्तानने आमच्या हवाई सीमांचे उल्लंघन केल्यास आम्ही आणखी जोरदार प्रत्त्यूत्तर देऊ असे तालिबानने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानकडून काबूल जवळच्या बगराम हवाई तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्याचे प्रत्त्यूत्तर असल्याचे तालिबानने म्हंटले आहे. हवाई हल्ला तर रोखण्यात आम्ही यशस्वी झालो होतो आता त्या कारवाईला उत्तर म्हणून हा ड्रोनद्वारे हल्ला केला असल्याचे तालिबानने स्पष्ट केले आहे.

Middle East Crisis: इराणसोबत किती दिवस संघर्ष चालणार? ट्रम्प यांनी वाढवली जगाची चिंता, म्हणाले, आमचा हेतू…

गेल्या वर्षी मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने नूर खान हवाई तळाला लक्ष्य केले होते. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की, या हल्ल्यांमध्ये रावळपिंडीतील नूर खान एअरबेस, बलुचिस्तानमधील क्वेटा येथील १२ व्या डिव्हिजनचे मुख्यालय आणि खैबर पख्तूनख्वा येथील मोहमंद एजन्सीमधील ख्वाझाई कॅम्पसह, प्रमुख पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यात आले.

अफगाणिस्तानच्या एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार त्यांनी शनिवार आणि रविवार अशा दोन दिवशी पाकिस्तानने काबूल आणि बगराम तसेच इतर भागांमध्ये बॉम्बहल्ले केले. त्यांना उत्तर म्हणून आम्ही ड्रोन हल्ला केले आहेत. या हल्ल्यात पाकिस्तानचे ३२ सैनिक मारले गेले आहेत अशी माहिती आहे असा दावा वृत्तसंस्थेने केला आहे.

अफगाण तालिबानी दहशतवाद्यांनी २,६०० किलोमीटरहून अधिक सीमेवरील ५३ ठिकाणी हल्ले करून आणि हवाई हल्ल्यांद्वारे देशातील लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करून हल्ला केल्यानंतर गुरुवारी रात्री पाकिस्तानने ऑपरेशन गजब लिल हक सुरू केले.

ताज्या बातम्या

Nashik Trimbakeshwar Crime News : त्र्यंबकेश्वरमध्ये चार हॉटेल्सवर गुन्हे; ग्राहकांच्या नोंदी...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) सुरक्षेचा मोर्चा हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिकांकडे वळवला आहे. पोलिस अधीक्षक डॉ....