Sunday, July 19, 2026
Homeदेश विदेशMiddle East Crisis: इराणसोबत किती दिवस संघर्ष चालणार? ट्रम्प यांनी वाढवली जगाची...

Middle East Crisis: इराणसोबत किती दिवस संघर्ष चालणार? ट्रम्प यांनी वाढवली जगाची चिंता, म्हणाले, आमचा हेतू…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिका इराण इस्राईलमधील संघर्ष मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शनिवारी अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला, यासोबतच संरक्षण मंत्री, आर्मी चिफ आणि गार्ड चीफसह ४८ पेक्षा जास्त नेते आणि सैन्य अधिकारी मारले गेले आहेत. इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आता या घटनेचे परिणाम पाहण्यास मिळत आहेत. या संघर्षाचा आता पुढचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंना फोन केला आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत चर्चा केली. असे असतानाच, डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाची चिंता वाढवणारे विधान करत युद्ध आणखी पेटण्याचे संकेत दिले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून लक्ष्य पूर्ण होईपर्यंत इराणवर हल्ले सुरुच राहणार असल्याची घोषणा केली आहे. ज्या शक्तींनी मानवी सभ्यतेच्या विरोधात युद्ध पुकारले आहे त्यांना अमेरिका शिक्षा करणारच. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स आणि सैन्य दलांना थेट इशारा दिला आहे की त्यांनी हल्ले थांबवले नाहीत तर आणखी मृत्यूंची तयारी ठेवा.

- Advertisement -

Middle East Crisis: मध्यपूर्व देशातील संघर्षाचे पडसाद; सेन्सेक्स कोसळला, सेंसेक्स ८० हजारांखाली, गुंतवणूकदार धास्तावले

ट्रम्प यांनी दिला इशारा
“नऊ युद्धनौका उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. तसेच, हे ऑपरेशन ठरलेल्या वेळेच्या आधी सुरू झाले आहे. या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचे ३ जवान शहीद झाले आहेत. अजूनही मृत्यू होण्याची शक्यता आहे,” असे ट्रम्प यांनी सांगितले.

“आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढत आहोत. आमचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही, तोपर्यंत पूर्ण ताकदीनिशी लढत राहू. आमचा हेतू अत्यंत स्पष्ट आहे. आम्ही आमच्या सैन्यांचा चांगल्या कामासाठी वापर करत आहोत,” असे ट्रम्प यांनी म्हटले.

ज्या शक्तींनी मानवी सभ्यतेच्या विरोधात युद्ध पुकारलं आहे त्यांना अमेरिका शिक्षा करणारच. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स आणि सैन्य दलांना थेट इशारा दिला आहे की त्यांनी हल्ले थांबवले नाहीत तर आणखी मृत्यूंची तयारी ठेवा.

Jay Pawar: “ही वेदना आयुष्यभर साथ देणार…”; जय पवारांनी VSR कंपनीचे मालक रोहित सिंह यांचा धक्कादायक व्हिडीओ केला पोस्ट

इराणाचे नेतृत्त्व कोणाकडे असले पाहिजे, असा प्रश्न विचारल्यावर ट्रम्प म्हणाले, “माझ्याकडे तीन अतिशय चांगले पर्याय आहेत. मी सध्या त्यांची नावे सांगणार नाही. आधी काम पूर्ण करूया.”

“मुळात नेतृत्त्व बदलायचे की नाही, हे माझ्यावर अवलंबून आहे. पण, अनेक वर्षांपासून मी याबद्दल बोलत आहे. त्यामुळे आता माझ्याकडे नक्कीच एक संधी आहे,” असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी आज...