Wednesday, May 22, 2024
Homeनंदुरबारसततच्या भांडणाला कंटाळून पित्याने केली पुत्राची हत्या

सततच्या भांडणाला कंटाळून पित्याने केली पुत्राची हत्या

आमलाड, ता.तळोदा  – 

सततच्या भांडणाला कंटाळून पित्याने पुत्राचा झोपेतच लोखंडी पाईपने मारहाण करुन खून केल्याची घटना रापापूर ता.तळोदा येथे घडली.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रापापूर ता.तळोदा येथील संदीप लक्ष्मण वसावे व लक्ष्मण दोहर्‍या वसावे यांच्यात नेहमी भांडण होत होते.

त्याचा राग आल्याने दि.17 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 ते 12.45 वाजेच्या सुमारास लक्ष्मण दोहर्‍या वसावे याने संदीप लक्ष्मण वसावे हा झोपलेला असतांना त्याच्या छातीवर, पोटावर व डोक्यावर लोखंडी पाईपने मारहाण करुन जीवे ठार मारले.

याबाबत दिलीप लक्ष्मण वसावे याने दिलेल्या फिर्यादीनुसार तळोदा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मयत संदीप वसावे याची पत्नी पुणे येथे खाजगी नोकरी करते.

त्यामुळे विचार विनीमय करुन आज नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेथून शून्य नंबरने तळोदा पेालीस ठाण्याला गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या