Saturday, April 26, 2025
Homeनगरतांभेरेच्या चिमुकल्याचा उष्माघाताने मृत्यू

तांभेरेच्या चिमुकल्याचा उष्माघाताने मृत्यू

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील 11 वर्षाच्या साई गोरक्षनाथ मुसमाडे या चिमुकल्याचा उष्मघाताने मृत्यू झाल्याची घटना रविवार 5 मे रोजी घडली आहे. वाढत्या उन्हामुळे चिमुकला साई याचा बळी गेल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.
तांभेरे येथील गोरक्षनाथ मुसमाडे यांचा एकुलता मुलगा साई हा इयत्ता 5 वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. उन्हाचा तडाखा बसल्याने साई याला उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

उन्हाचा तडाखा बसल्याने उष्माघाताने साई याला त्रास होऊन मृत्यूचा सामना करावा लागला आहे. साई याच्यावर रविवारी तांभेरे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत साईच्या पश्चात आई व वडील असा परिवार आहे. साई मुसमाडे हा मच्छिंद्र मुसमाडे यांचा पुतण्या तर संतोष व संदीप मुसमाडे यांचा चुलतभाऊ होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...