Saturday, September 14, 2024
Homeदेश विदेशफटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ३ महिलांसह ८ मृत्युमुखी

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ३ महिलांसह ८ मृत्युमुखी

कृष्णागिरी । Krishnagiri

- Advertisement -

तामिळनाडूमधील कृष्णागिरी जिल्ह्यातील एक फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यात तीन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी ही घटना घडली. अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

फटाक्यांचा हा स्फोट एवढा शक्तीशाली होता की आजुबाजुच्या तीन चार घरांचे नुकसान झाले आहे. काहीजण या इमारतीखाली अडकले असल्याचे सांगितले जात आहे. अनेकजण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत गंभीर असलेल्या १२ जणांना रुग्णालयात दाखल केलं आहे. दुर्घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अनेक तास प्रयत्न सुरू होते. यामध्ये अडकलेल्या लोकांची नेमकी संख्या अद्याप समजू शकलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या