Friday, November 15, 2024
Homeराजकीयतामिळनाडूचे कृषीमंत्री आर. दोराईकन्नू यांचे करोनाने निधन

तामिळनाडूचे कृषीमंत्री आर. दोराईकन्नू यांचे करोनाने निधन

दिल्ली | Delhi

तामिळनाडूचे कृषीमंत्री अद्रुमकचे नेते आर. दोराईकन्नू (Tamil Nadu Agriculture Minister R Doraikkannu) यांचं शनिवारी रात्री निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. दोराईकन्नू १३ ऑक्टोबर रोजी करोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने त्यांनी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांनी शनिवारी रात्री रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरावदिंदन सेल्वराज यांनी मेडिकल बुलेटिनदरम्यान त्यांचा शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजता मृत्यू झाल्याचे जाहीर केले. दरम्यान, मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी यांनी काल संध्याकाळी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे सुद्धा ऑगस्ट महिन्यांत करोना पॉझिटिव्ह आढळले होते.

दोराईकन्नू हे 2006 साली तामिळनाडूच्या पापनासम विधानसभा मतदार संघातून निवडून आले होत. त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरूच राहिला. त्यांनी 2011 आणि 2016 मध्ये ते पुन्हा विधानसभा निवडणूकीत निवडून आहे होते. 2016 साली त्यांना मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी मंत्रीपद दिले होते. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या