Wednesday, May 6, 2026
Homeदेश विदेशThalapathy Vijay: तामिळनाडूत सत्तास्थापनेआधी मोठा राजकीय भूकंप होणार? विरोधी पक्षातील ३० आमदार...

Thalapathy Vijay: तामिळनाडूत सत्तास्थापनेआधी मोठा राजकीय भूकंप होणार? विरोधी पक्षातील ३० आमदार फुटीच्या उंबरठ्यावर

मुंबई | Mumbai
नुकत्याच पार पडलेल्या तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षाने सनसनाटी विजय मिळवला आहे. विधानसभेतील २३४ पैकी १०८ जागा जिंकत विजय याचा टीव्हीके पक्ष तामिळ नाडूतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सोबतच विजयच्या पक्षाने द्रमुक आणि अण्णा द्रमुक या द्रविड अस्मितेचे राजकारण करणाऱ्या प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का दिला आहे. मात्र बहुमतासाठी १० जागा कमी पडल्याने सरकार स्थापनेसाठी मॅजिक फिगर गाठण्यासाठी विजय याचा पक्ष कुणाला सोबत घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली असतानाच दुसरीकडे विरोधी बाकाकडून मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहे.

तामिळनाडूत सत्तास्थापन होण्याआधीच एआयएडीएमके पक्षाची आजची होणारी विधिमंडळ दलाची बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. अण्णा द्रमुक पक्षात मोठी बंडाळी माजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा एडप्पाडी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील ४७ आमदारांपैकी तब्बल ३० हून अधिक आमदारांनी सुपरस्टार विजय याच्या ‘टीव्हीके’ पक्षाला पाठिंबा देण्याची मागणी लावून धरली आहे.

- Advertisement -

AIADMK मध्ये बंड
मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाद्रमुक पक्षाच्या ४७ पैकी बहुतांश आमदार TVK सोबत युती करण्यासाठी आग्रही आहेत. माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकचे ज्येष्ठ नेते एडप्पाडी यांना एक अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला आहे. जर त्यांनी लवकर निर्णय घेतला नाही, तर ३० हून अधिक आमदार पक्षातून बाहेर पडून विजय यांना आपला पाठिंबा जाहीर करण्यास सज्ज आहेत. या बंडाचे नेतृत्व सी.व्ही. षण्मुगम हे करत आहेत.

बंडाचे केंद्रस्थान सध्या सी.व्ही. ष्णमुगम यांचे निवासस्थान झाले असल्याची चर्चा आहे. काही वेळातच एआयएडीएमकेचे अनेक आमदार त्यांच्या भेटीसाठी पोहोचणार असल्याची बातमी आहे. या बैठकीनंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो. विजयच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदारांचा कल ‘टीव्हीके’कडे झुकला असल्याचे बोलले जात आहे.

Punjab Explosion: पंजाब हादरलं! दोन तासांत जालंधर, अमृतसरमध्ये BSF मुख्यालय परिसरात भीषण स्फोट

दुसरीकडे पक्षातील संभाव्य फूट टाळण्यासाठी आणि काँग्रेसला तामिळनाडूमधील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी संपूर्ण अण्णा द्रमुक पक्षच विजयच्या ट्वीव्हीके पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे.

TVK चे आमदार रिसॉर्टवर
सत्तास्थापनेचा पेच सुटेपर्यंत TVK ने आपल्या १०८ नवनिर्वाचित आमदारांना खबरदारीचा उपाय म्हणून मल्लापुरम येथील एका आलिशान खासगी रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. विजय यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सर्व आमदारांना या रिसॉर्टवर नेण्यात आले. सुरक्षिततेसाठी रिसॉर्टबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पाळत वाढवण्यात आली आहे. सध्या ५० हून अधिक आमदार ‘फोर पॉइंट्स स्टार’ हॉटेलमध्ये असून, उर्वरित आमदारही लवकरच तेथे पोहोचतील, असेही पक्षाच्‍या सूत्रांनी स्‍पष्‍ट केले.

१० आमदारांच्या पाठिंब्याची गरज
विजय यांना आणखी १० आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. यामध्ये काँग्रेसचे ५ आमदार, भाकप आणि माकप आणि व्हिसीके पक्षाचे प्रत्येकी दोन असे ११ आमदार कोणती भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विजय यांच्यासमोर अण्णा द्रमुक यांचा पाठिंबा घेण्याचा पर्याय असू शकतो. मात्र, त्यासाठी अण्णा द्रमुकला भाजपशी असलेली आघाडी तोडावी लागेल अशी चर्चा आहे.

ताज्या बातम्या

राधा

पंढरपूरमध्ये नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ, किरकोळ कारणावरुन हुल्लडबाजांचा तुफान...

0
सोलापूर | Solapurपंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमात मोठा राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गावात सुरू असलेल्या यात्रेनिमित्त आयोजित या...