Saturday, November 23, 2024
HomeमनोरंजनG Marimuthu : प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, डबिंग स्टुडिओमध्ये घेतला अखेरचा...

G Marimuthu : प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, डबिंग स्टुडिओमध्ये घेतला अखेरचा श्वास

दिल्ली | Delhi

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी आली आहे. लोकप्रिय तमिळ अभिनेते आणि दिग्दर्शक जी मारीमुथू यांचे आज (८ सप्टेंबर रोजी) वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. सकाळी ८.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना हृदविकाराचा झटका आला होता.

- Advertisement -

जी मारीमुथू ‘इथिर नीचल’ या त्यांच्या टेलिव्हिजन शोचे डबिंग करताना ते कोसळले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मारीमुथू हे रजनीकांत यांच्या ‘जेलर’ आणि ‘रेड सँडल वुड’मध्ये होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

मारिमुथू यांनी १९९९ मध्ये अजितच्या ‘वाली’ चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी असई (१९९९) या चित्रपटात दिग्दर्शक वसंत यांना असिस्ट केले, ज्यात अजित, सुवललक्ष्मी आणि प्रकाश राज मुख्य भूमिकेत होते. त्याचबरोबर त्यांनी कन्नम कन्नम (२००८) या चित्रपटातुन दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते.

त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन तर केलेच पण कथा, पटकथा आणि संवादलेखनही केले आणि चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली होती. अनेक तामिळ चित्रपटात ते सहाय्यक अभिनेत्याच्या भुमिकेत दिसले. ज्यात युद्धम सेई, कोडी, बैरवा, काडैकुट्टी सिंगम, शिवरंजिनीयुम इनुम सिला पेंगलम, आणि अतरंगी रे या हिंदी चित्रपट यांचा समावेश आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या